Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरने हे दुष्कृत्य केलं असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय चिमुकल्याला त्याचे पालक पाठवत होते. या चिमुकल्यावर 15 मे आणि 21 मे अशा दोन वेळा तिथे डान्स टीचर म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र दुलानी या नराधमाने लैंगिक अत्याचार केले.
नक्की वाचा - Akola Crime : बेडरूममध्ये झोपायला गेले अन् घात झाला; 9 वर्षीय स्वराजचा गाढ झोपेत मत्यू, काही वेळाने वडिलही दगावले
यानंतर मुलाला त्रास होऊ लागल्याने पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. त्यामुळे हादरलेल्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठत नराधम जितेंद्र दुलानी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तातडीने या नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.