Navi Mumbai: निवडणुकीच्या तोंडावर RPI च्या जिल्हा सचिवांवर जीवघेणा हल्ला, खतरनाक CCTV व्हिडीओ आला समोर

नवी मुंबई (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)आरपीआयचे जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Koyta Attack News
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News : नवी मुंबई आरपीआयचे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यात दिलपाक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, गुन्हेगारी घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली असून आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हा हल्ला पूर्वनियोजीत होता का? सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे आरपीआयचे जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आंबेडकरी समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि त्यांचा आका कोण आहे? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Palghar News: 100 उठाबशांची शिक्षा भोवली! सरकारने शाळेची मान्यता केली रद्द, 'या' बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई

हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचं समजते. 

Advertisement

नवी मुंबईत गुन्हेगारी वाढतेय

नवी मुंबईत गेल्या काही काळापासून चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गुन्हेगार खुलेआम वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय कार्यकर्त्यावर झालेला हा हल्ला म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे, याचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वैरातून हल्ल्याचा संशय

हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, राजकीय वैरातूनच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हल्लेखोरांसह या हल्ल्यामागील ‘आका'लाही तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Advertisement