Shirdi News: साई भक्तांत भितीचं वातावरण, 'ही' घटना ठरतेय कारणीभूत, सर्वांचीच चिंता वाढली

तामिळनाडू येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी द्वारावती आल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • तामिळनाडूतून शिर्डी दर्शनासाठी आलेल्या महिला भक्तेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी चोरली
  • या सोन्याच्या गंठणाची बाजारभावानुसार किंमत तेरा लाख रुपये आहे
  • चोरट्यांच्या हालचाली एका कारच्या डॅशकॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
शिर्डी:

सुनिल दवंगे 

साईनगरी शिर्डीत अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे साई भक्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुरवरून अनेक भक्ती साईंचे दर्शन घेण्यासाठी येतात. अशा वेळी त्यांच्या बरोबर जी काही घटना झाली आहे त्यामुळे ते हादरून गेले आहे. तामिळनाडू येथून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील तब्बल आठ तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरली गेली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी क्षणार्धात ही गंठण ओरबाडून नेली. विशेष म्हणजे ही घटना अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या परिसरात घडली. चोरट्यांच्या हालचाली एका कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

नक्की वाचा - Love Jihad News: 'लग्नाला 8 वर्ष, 3 मुलं, मग लव्ह जिहाद कसा', उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण

Advertisement

तामिळनाडू येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी द्वारावती आल्या होत्या. त्या भक्त निवास परिसरातून मुख्य रस्त्याकडे जात होत्या. याचवेळी हेल्मेट घालून दुचाकीवर दोघे जण आले. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी  त्यांच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे सोन्याचे गंठण क्षणार्धात हिसकावून नेले. आजच्या बाजार भावानं या गंठणाची किंमत तेरा लाख रुपये आहे. ही घटना इतक्या वेगाने घडली की सुरुवातीला नेमकं काय झालं हे त्या महिलेलाच समजलं नाही. मात्र काही क्षणात गळ्यात तीव्र जळजळ आणि वेदना जाणवू लागल्यानंतर त्यांनी हात लावला असता गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला.

नक्की वाचा - परीक्षा दिली, पास झाला, पण डिग्रीसाठी 9 वर्षांची प्रतिक्षा! काय आहे 'त्या' मुस्लीम तरुणाच्या संघर्षाची कहाणी

महिलेचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि भाविक धावून आले. मात्र तोपर्यंत दुचाकीवरील दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनास्थळी उभ्या असलेल्या एका कारच्या डॅशकॅमेरामध्ये संशयित चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली जात आहे. त्या द्वारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेनं साई नगरीत खळबळ उडाली आहे. शिवाय बाहेरगावहून आलेल्या साई भक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेचा ही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पोलीस आता या चोरट्यांना शोधून काढणार का हा खरा प्रश्न आहे. मात्र ज्यांची गंठण चोरीला गेली आहे त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.