जाहिरात

Love Jihad News: 'लग्नाला 8 वर्ष, 3 मुलं, मग लव्ह जिहाद कसा', उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण

सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणात इमरान शेखसह सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.

Love Jihad News: 'लग्नाला 8 वर्ष, 3 मुलं, मग लव्ह जिहाद कसा', उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण
  • उल्हासनगरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण समोर आले असून आरोपींना अटक केल्यानंतर कोर्टाने तातडीने जामीन मंजूर केला आहे
  • आरोपी इमरान शेखने लग्नाच्या वेळी आपले नाव विजय असल्याचे सांगितले होते असा पीडितेचा आरोप आहे
  • पीडित महिलेने बिहारमध्ये लग्नानंतर छळ आणि बुरखा, गोमांस खाण्यास जबरदस्ती याची तक्रार केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
उल्हासनगर:

अमजद खान 

लव्ह जिहादचं एक प्रकरण उल्हासनगरमध्ये समोर आलं आहं. पण या प्रकरणाला आता वेगळच वळण लागलं आहे. आरोपीला अटक केल्यानंतर कोर्टाने मात्र त्याला तातडीने जामीन दिला. ज्या कारणासाठी जामीन दिला  त्यावरून हे प्रकरण लव्ह जिहादचं नाही तर काही तरी वेगळच आहे असा निष्कर्ष काढला जात आहे. उल्हानसनगरमधल्या एका हिंदू तरुणी सोबत  इमरान शेख याने 2019 मध्ये लग्न केले होते. त्यावेळी त्याने आपले नाव विजय असल्याचं सांगितलं होतं असा तरुणीचा आरोप आहे. लग्नानंतर ती बिहारला गेली होती. तिथे आपला छळ झाल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर संबंधीत आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 

लग्नाला आठ वर्ष झाले. तीन आपत्य झाली तर हे प्रकरण लव्ह जिहादचे कसे असा सवाल बचाव पक्षाचा वकिलाने युक्तीवादा वेळी केला. कोर्टाने ही तो मान्य केला. शिवाय उल्हासनगर कोर्टाने अटक केलेल्या  तिघांना ही जामीन मंजूर केलं. त्यामुळे उल्हासनगर मधील या लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यात जी बाब समोर आली आहे त्यानुसार  पीडितेच्या पतीने दुसरं लग्न केलं. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे समोर आले आहे. यावादातूनच तिने ही तक्रार केल्याचं बोललं जात आहे. 

नक्की वाचा - Ulhasnagar News: लग्नानंतर अचानक समोर आला बुरखा अन् गोमांस; उल्हासनगरच्या हिंदू मुलीचा बिहारमध्ये भयंकर छळ

 तिच्या तक्रारीनंतर पोलीसांनी इमरान शेख आणि त्याचा दोन भावांना अटक केली होती. पीडित महिलेने आरोप केला होता की इमरानने आपले नाव विजय असल्याचं सांगितले होते. शिवाय आपण हिंदू आहे असं ही तो म्हणाला होता. पुढे दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न ही केले. लग्नानंतर ते बिहारला गेले. तिथे आपल्याला बुरखा हिजाब घातल्याची शक्ती केली गेली. एवढेच नाही तर गोमांस खायला देखील सांगितले असा तिचा आरोप आहे. पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी हिंदू देवी देवता विषयी आक्षेपार्ह  विधान केले. सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणात इमरान शेखसह सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. 

नक्की वाचा - परीक्षा दिली, पास झाला, पण डिग्रीसाठी 9 वर्षांची प्रतिक्षा! काय आहे 'त्या' मुस्लीम तरुणाच्या संघर्षाची कहाणी

इम्रान शेखसह दोन भावांना अटक करून उल्हासनगर कोर्टात हजर केलं. याबाबत उल्हासनगर सेंटर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले, संबंधित प्रकरणात इमरान शेखसह तिघांना अटक करण्यात आली होती. कोर्टासमोर तिघांना हजर केले गेले. इमरान शेख यांने दुसरं लग्न केलं. त्यानंतर पीडिच महिलेने तक्रार केली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. उल्हासनगर कोर्टात हजर केले असता आरोपी आणि पीडिताचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मुलांसोबत फोटो दाखवले गेले. तसेच काही टेक्निकल बाबींवर विचार करता कोर्टाने आरोपींना जामीन दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com