Shirdi Crime : साईंची पालखी जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेलांमध्येच देहविक्रय व्यवसाय, पोलिसांची मोठी कारवाई  

शिर्डीतील साई पालखी रोडवरील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शिर्डीतील साई पालखी रोडवरील दोन हॉटेलांमध्ये वेश्या व्यवसायाचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं उघड झालं आहे. साईबाबांच्या शिर्डीत हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिर्डीमधील हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकत चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सण उत्सवासात साईबाबांचा रथ आणि पालखी जाणा-या पवित्र्य मार्गावर हॉटेल सावता आणि बारकाबाई गेस्ट हाऊस येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी शिर्डी पोलिसात केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज अचानक धाड टाकून येथे रुम तपासले असता चार महिला आणि दोन पुरुष मिळून आले आहे. महत्वाचं म्हणजे यातील व्यवसाय करणा-या महिलांवर याआधी ही कारवाई करण्यात आली होती. वारंवार कारवाई होऊन देखील अशा पद्धतीने अवैध व्यवसाय केला जात असल्यानं पोलिसांचा धाक कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Jalna News : महादेवाच्या दर्शनासाठी निघाले, दुसऱ्या दिवशी शेततळ्यात तरंगत होते तिघांचे मृतदेह; जालन्यातील जोशी कुटुंब धक्क्यात 

चालक-मालकांवर पिटाअंतर्गत कारवाई..
शिर्डीतील साई पालखी रोडवरील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस येथे पोलिसांनी अचानक छापा टाकत चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल चालक-मालक यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई केली असून या निमित्तानं अवैध व्यवसायिकाचे धाबे दणाणलेत. 

Topics mentioned in this article