ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. त्याच्या कार्यालयात जावून शिवसैनिकांनी चौप दिला. आधी त्याने या प्रश्नी उडवा उडवीची उत्तर दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या तोंडावा काळं फासलं. त्यानंतर त्याला चोप दिला. हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत झाला. त्यानंतर पंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदखेडा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविका असलेल्या महिलने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवाय 2020 पासून ते महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत. गेल्या चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासाला या ग्रामसेविका कंटाळल्या होत्या.
ट्रेंडिंग बातमी - आमदारांनी स्वत:च्या हाताने कार्यकर्त्याला घातली चप्पल , त्यांनी असं का केलं?
सतत होणारा हा जाच त्यांना असह्य झाला होता. त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. अशा वेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार सांगितला.यानंतर त्यांनी शिंदखेडा येथील पंचायत समिती कार्यालय गाठवे. विस्तार अधिकाऱ्याच्या कार्यालयातही ते गेले. तिथे संबधित अधिकारी ही उपस्थित होता. अशा वेळी शिवसेना स्टाईलने त्यांना वाचारणा करण्यात आली.
महिलेने केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली. शिवाय तुम्ही असं का करत आहात असा जाबही त्यांना विचारण्यात आला. अशा वेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. पिडीत महिला ही त्यावेळी तिथे उपस्थित होती. तीने त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्याला चोप देण्यात आला. शिंदखेडा पंचायत समिती येथे हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.