शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पंजाबच्या मोगा इथं घडली. मंगत राय असं त्यांचं नाव असून ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. ते गेली अनेक वर्ष शिवसेनेसाठी पंजाबमध्ये काम करत होते. गुरूवारी रात्री 10 वाजता त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगत राय हे शिवसेनेसाठी गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यानंतर पोलीसांना सुरूवातीला काही माहिती हाती लागली आहे. त्यानुसार मंगत हे रात्री दुध आणण्यासाठी घरा बाहेर पडले होते. त्याच वेळी तिथे तीन अज्ञात लोक मोटरसायकलवरून आले. त्यांनी मंगत यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. फायरींग इतकी जबरदस्त होती की मंगत यांना हालचाल करण्याची संधीच मिळाली नाही.
गोळीबार केल्यानंतर हे आरोपी तिथून फरार झाले. याबाबतची माहिती स्थानिक पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस मंगत राय याना घेवून रुग्णालयात गेले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत अनेक लोकांची चौकशी केली आहे. त्या शिवाय या भागातली सीसीटीव्ही फुटेज ही पोलीस तपासत आहेत. त्यातून काही तरी धागेदोरे मिळतील असा विश्वास पोलीसांना आहे.
या हत्येचे पडसाद पंजाबमध्ये उमटले आहे. विश्व हिंदू शक्तिचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा यांनी हत्येचा निषेध केला आहे. ज्यांनी ही हत्या केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी शर्मा यांनी यावेळी केली. मंगत यांची र्टेडियम रोडवर गोळी मारून हत्या करण्यात आल्याची माहिती डीएसपी सिटी रविंदर सिंह यांनी दिली. शिवाय त्यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात ठेवला असल्याचं ही त्यांनी सांगितलं. हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.