जाहिरात

Beed News: 'खोक्या मामाचं घर जाळलं, लेकरांना...' भाची रडली, अंजली दमानियाही संतापल्या

Beed News: 'खोक्या मामाचं घर जाळलं, लेकरांना...' भाची रडली, अंजली दमानियाही संतापल्या

मोसीन शेख, बीड: बीडच्या शिरुरमधील मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर वनविभागाच्या हद्दीत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर वन विभागाने कडक कारवाई करत  त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला, त्याचं घर पाडण्यात आले. वन विभागाच्या या कारवाईनंतर अज्ञातांनी मध्यरात्री त्याचे घर पेटवल्याचे समोर आले आहे. यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या अनधिकृत घरावर काल वनविभागाकडून बुलडोझर चालवण्यात आले. यावेळी वनविभागाकडून त्याच्या घरातील सर्वसामान्यांची जप्ती देखील करण्यात आली.मात्र रात्री काही अज्ञातांकडून खोक्याच्या घरासमोर असलेल्या जनावरांच्या चाऱ्याला आग लावण्यात आली.

सतीश भोसले यास बीड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शिऊर कासार पोलीस ठाण्यात धाव घेऊन काही गंभीर आरोप केले आहेत. वनविभागाच्या कारवाईनंतर खोक्याच्या घर आणि परिसर अज्ञात लोकांनी पेटवून दिला आहे. त्यामुळे आम्ही या गावगुंडांच्या दहशतीखाली आहोत. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी खोक्या ऊर्फ सतीश भोसलेच्या नातेवाईकांनी केले आहे.

सतीश भोसले याची बहीण आणि भाचीने याबाबत माध्यमांना माहिती दिली. आमच्या मामाचे घर जाळले. त्यामध्ये असलेले कोंबड्या गुरेही जळालीत. तिथे असलेल्या लहान मुलींना मारहाणही झाली आहे. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्हाला समजल्यानंतर आम्ही शेवगावहून इथे आलो. घर जाळणाऱ्यांना अटक करा आम्हाला न्याय द्या, अशी मागणी भाची कोमल काळेने केलीय. 

नक्की वाचा - Smart Pension Plan: गुंतवणूक एकदा, आयुष्यभर फायदा! काय आहे LIC 'स्मार्ट' पेन्शन योजना'? पाहा A to Z माहिती

"सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं.  किती क्रूर. परिवाराची काय चूक ?  दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला ? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं ? नाही हे योग्य नाही," असे म्हणत अंजली दमानियांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे.