राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडाचा मुख्य मारेकरी शिवकुमार गौतम याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
नक्की वाचा - "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका
वांद्रे पूर्वेकडील झिशान सिद्दीकी याच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये धर्मराज कश्यप, गुरमिल सिंह या दोघांना पोलिसांनी पकडलं. मात्र त्यातील मुख्य सूत्रधाराला पळ काढण्यात यश आलं. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर शिवकुमार गौतम याला नेपाळ सीमा बहराईचमधून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हल्ला केल्यानंतर गौतम कपडे बदलून पुन्हा घटनास्थळी आला होता. यावेळी काही पोलिसांनी त्याच्याकडे हल्ला करणाऱ्यांपैकी कोणाला पाहिलं आहे, असाही सवाल उपस्थित केला होता. शिवकुमार इतक्यावरच थांबला नाही. तर तो तेथून लिलावती रुग्णालयात पोहोचला, जिथं बाबा सिद्दीकी यांच्यावर उपचार सुरू होते. शिवकुमार तिथं जाऊन तब्बल 30 मिनिटे थांबून राहिला. बाबा सिद्दीकी यांच्या तब्येची खात्री झाल्यानंतर तो रिक्षेने कुर्ल्याला गेल्याची माहिती आहे. कुर्ल्याहून तो पुण्याला गेला. यादरम्यान त्याने आपला मोबाइल फोनही फेकून दिला.