जाहिरात

"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका

भाजप ब्रिटीशांसारखीच आहे. ब्रिटीशांनी देखील त्यावेळी फोडा-फोडीचं राजकारण केलं. भाजपने देखील महाराष्ट्रात कुटंब फोडलं, पक्ष फोडला. फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने हे सगळं केलं, असंही रोहित पवारांनी म्हटलं.

"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका

निलेश बंगाले, वर्धा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणार व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याइतकं खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व मी आजपर्यंत पाहिलं नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं. वर्ध्याच्या कारंजा येथे ते बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटं बोलणारं व्यक्तीमत्व. त्यांच्यासारखं खोटं देशात आणि राज्यात कुणीही बोलू शकणार नाही. जर नेताच इतका खोटारडा असेल, तर त्यांचा उमेदवार किती खोटं बोलून शकतं, तुम्ही समजून घ्या.  असं म्हणत रोहित पवारांना फडणवीसांसह कारंजा येथून महायुतीचे उमेदवार सुमीत वानखडे यांचा देखील समाचार घेतला. 

(नक्की वाचा : रामटेकवरुन 'मविआ'त वादाची ठिणगी! काँग्रेसकडून बंडखोरांचा प्रचार, ठाकरे गट आक्रमक)

भाजप ब्रिटीशांसारखीच आहे. ब्रिटीशांनी देखील त्यावेळी फोडा-फोडीचं राजकारण केलं. भाजपने देखील महाराष्ट्रात कुटंब फोडलं, पक्ष फोडला. फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने हे सगळं केलं. सत्तेत येऊन त्यांना लोकांचं काही भलं करायचं नव्हतं. फक्त मोठ्या लोकांचं भलं करायचं होतं, अशी टीका रोहित पवारांनी केली. 

(नक्की वाचा : शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?)

काही वर्षांमध्ये जर बघितलं तर भाजपचे नेते जेव्हा येतात तेव्हा शेतकरी, महिलाबद्दल बोलत नाहीत. त्यांना फक्त लाडकी खुर्ची महत्वाची आहे. फक्त ते बटेंगे तो कंटेंगे अशी भाषा बोलतात. द्वेषाची भाषा करतात. महाराष्ट्रात कटेंगे आणि बटेंगे ही भाषा चालत नाही. उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील भाषा इथं चालत नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com