Ashok Dhodi: अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट! सख्खा भाऊचं मुख्य आरोपी? खळबळजनक खुलासा

या प्रकरणात अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडीलाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र तो पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला असून या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 मनोज सातवी, प्रतिनिधी: 

Ashok Dhodi Case Update:  शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. 20 जानेवारीपासून अशोक धोडी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडीलाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र तो पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला असून या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक धोडी अपहरण प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी अविनाश धोडी फरार झाल्याने पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या घोलवड पोलिस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीतून हा संशयित आरोपी फरार झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता  अशोक धोडी यांच्या अपहरणामागे अविनाश धोडी हाच खरा आरोपी असून तो पोलिसांच्या ताब्यातून पळालाच कसा.?  असा सवाल अशोक धोडी यांच्या पत्नीने उपस्थित केला आहे.  अविनाश धोडी हा गुंड प्रवृत्तीचा दारू तस्कर असून त्याची या संपूर्ण परिसरात मोठी दहशत असल्याचे सांगत या अगोदर देखील त्यांनी माझ्या वडिलांवर प्राण घातक  हल्ले केल्याचा आरोप अशोक धोडी यांचा मुलगा आकाश याने केला आहे. 

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात संशयित म्हणून अविनाश धोडीला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र संशयित आरोपी अविनाश रमण धोडी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. संशयित अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ असून  दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन आणि संपत्तीवरुन वाद सुरु आहे.अविनाश धोडीचा दारूचा धंदा असून  त्याची परिसरात दहशत असल्याची माहिती समोर आली होती.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sad news: 2 सिक्स मारले अन् कोसळला, क्रिकेटच्या ग्राऊंडवर भयंकर घडलं

या अगोदरही अविनाश धोडी याने 21 एप्रिल 2024 रोजी  अशोक धोडीवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून  अशोक  धोडी यांचा थोरला मुलगा आशिष धोडी याचा 2018 मध्ये झालेला अपघाती मृत्यू हा अविनाश  धोडी यानेच घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच , 21 एप्रिल 2024 मध्ये अशोक धोडी यांच्यावर प्राणघातक हल्ल्यामागे देखील  अविनाश धोडी असल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.