मनोज सातवी
क्रिकेट खेळताना ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहे. त्यातील एक घटना ही वसईत तर दुसरी घटना ही नाशिकमध्ये घडली आहे. क्रिकेट खेळताना दोन खेळाडूंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका येण्या आधी या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटचे मैदान गाजवले होते. ते अचानक असे सर्वांमधून जातील असं कुणीही स्वप्नातही पाहीलं नसेल. विशेष म्हणजे या दोघांचे ही वय अतिशय कमी होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिली घटना ही वसई तालुक्यातल्या कोपर गावात घडली. इथं एका तरुणाचा मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. सागर वझे असे या तरुणाचे नाव होते. सागर केवळ 27 वर्षाचा होता. सागर हा चांगला क्रिकेटपटू होता. हृदयविकाराचा झटका येण्या आधी त्याने लगोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले होते. मात्र तिसरा षटकार मारत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
त्याच वेळी तो खाली कोसळला. त्यानंतर सर्व खेळाडू त्याच्या दिशेने धावले. पण त्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे सागरला या अगोदर ही हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टरने त्याला क्रिकेट खेळात बंदी घातली होती. मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. सागर फळंदाजीसाठी येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.
तर दुसरी घटना ही नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवडमध्ये क्रिकेटचे सामने सुरु होते. इथं 24 वर्षीय यश सुनिल अहिरे याचा हृदयविकराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. क्रिकेट स्पर्धेत यशने चांगली फटकेबाजी केली होती. तो बाद झाल्यानंतर मैदाना बाहेर बसला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तीव्र ह्दय विकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यशचा हा शेवटच्या सामन्याचा खेळतांनाचा त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world