Couple Murder : प्रेमी जोडप्याच्या हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे. या प्रकरणात मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर माहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलानं हॉस्पिटलमधील उपचाराच्या दरम्यान जीव सोडला. मुलांच्या नातेवाईकांनी हे प्रकरण ऑनर किलींगचं असल्याचं सांगितलं असून मुलीच्या कुटुंबीयांवर दोघांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तर मुलानं पहिल्यांदा मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहणीत मुलाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रककणात दोन्ही पक्षाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातले हे प्रकरण आहे. पोलिसांनी महबरा गावातल्या मोहम्मद हुसेन यांची 25 वर्षांची मुलगी जाफरीनचा मृतदेह जप्त केला. त्यानंतर साबदामधील राहुल उर्फ मुर्शिद खानला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलमधील उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील घटनास्थळीची पाहणी केली. तसंच दोन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.
राहुलचा झाला मुर्शिद!
मृत राहुलच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचं गेल्या काही दिवसांपासून जाफरीनवर प्रेम होतं. दोघांचा धर्म वेगळा असल्यानं जाफरीनच्या कुटुंबीयांनी राहुलला इस्लाम धर्म स्विकारण्याची अट घातली होती. राहुलनं ती अट मान्य केली. त्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार करत स्वत:चं नाव मुर्शीद खान ठेवलं.
( नक्की वाचा : India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे? )
मुलानं धर्मांतर केल्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी जाफरीनचं लग्न दुसरिकडं लावलं, असं राहुलच्या घरच्यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी जाफरीन माहेरी आली होती. तिला रात्री 3 च्या सुमारास भेटायला बोलावले होते. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकांनी राहुल आणि जाफरीनची हत्या केली.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिक्षक अंकुर अग्रवाल यांनी मात्र संपूर्ण प्रकरणाची वेगळी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे नाराज राहुलनं मुलीच्या गावी जाऊन तिला भेटायला बोलावलं आणि तिची सुरीनं हत्या केली.
या प्रकरणामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी राहुलची मारहण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान त्यानं प्राण सोडले. या हत्याकांडानंतर गावात मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.