जाहिरात

Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग

Father Hangs 5 Family Members : 'बाबा बाथरुमला गेले होते. तिथून घरी परत आल्यावर त्यांनी एक-एक करून बहिणींना फाशीच्या फंद्यावर लटकवलं. त्यानंतर आमच्या गळ्यातही फाशीचा दोर बांधला, असा धक्कादायक अनुभव 6 वर्षांच्या शिवमनं सांगितला आहे.

Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग
Shocking News : या वेदनादायक घटनेचा अनुभव सांगताना त्याच्या डोळ्यांत भीती आणि आवाजात वडील आणि  बहिणींना गमावल्याचे दुःख जाणवत होते.
मुंबई:

Father Hangs 5 Family Members and Self:  'बाबा बाथरुमला गेले होते. तिथून घरी परत आल्यावर त्यांनी एक-एक करून बहिणींना फाशीच्या फंद्यावर लटकवलं. त्यानंतर आमच्या गळ्यातही फाशीचा दोर बांधला, असा धक्कादायक अनुभव 6 वर्षांच्या शिवमनं सांगितला आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील हे अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे. शिवमच्या वडिलांनी त्याच्या पाच मुलांपैकी तिघांना फाशी देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. या घटनेतील 6 वर्षांचा शिवम आणि त्याचा 5 वर्षांचा धाकटा भाऊ चंदन हे मृत्यूच्या दारातून सुदैवाने परत आले आणि वाचले.

काय आहे प्रकरण?

रविवारी रात्री शिवमच्या घरी जे काही घडले, ते तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. शिवमच्या डोळ्यांदेखत त्याचे वडील आणि त्याच्या तीन बहिणी फाशीच्या फंद्यावर लटकल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. वडिलांनी शिवम आणि चंदनलाही फासावर लटकवले होते, पण ते दोघे कसेतरी बचावले. 

या वेदनादायक घटनेचा अनुभव सांगताना त्याच्या डोळ्यांत भीती आणि आवाजात वडील आणि  बहिणींना गमावल्याचे दुःख जाणवत होते.

( नक्की वाचा : Sindhudurg News : मोबाईलमधील रहस्यामुळे प्रेमकथेची शोकांतिका,तरुण जोडप्याच्या निर्णयानं सिंधुदुर्गात खळबळ )

वडिलांनी शिवम आणि चंदनलाही फासावर लटकवले होते, पण ते दोघे कसेतरी बचावले. घटनेच्या अनेक तासांनंतरही हे दोन्ही लहानगे इतके घाबरलेले आहेत की, ते ना डोळे उघडू शकत आहेत, ना तो भयानक प्रसंग नीट बोलून दाखवू शकत आहेत. तो प्रसंग सांगताना शिवमची जीभही थरथरत होती.


शिवम आणि चंदनचा जीव कसा वाचला?

वडिलांनी शिवम आणि चंदनच्या गळ्यातही फाशीचा दोर बांधला होता. ते दोघेही मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण सुदैवाने, या दोन्ही मुलांचे पाय खाली ठेवलेल्या एका पेटीला लागले. त्यामुळे शिवम कुमार आणि चंदन कुमार या दोन्ही निष्पाप मुलांचा जीव वाचला. तर त्यांचे वडील अमरनाथ राम आणि त्यांच्या तीन मुली  *12 वर्षांची अनुराधा कुमारी, 11 वर्षांची शिवानी कुमारी आणि 7 वर्षांची राधिका कुमारी यांचा मृत्यू झाला. हा भयानक प्रसंग पाहून दोन्ही मुलं शहारली आहेत.  

( नक्की वाचा : Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि.... )

बाबांनी सर्वांना फासावर लटकवले

मृत्यूचा तो भयानक प्रसंग आठवताना शिवम कुमारने एका वृत्तसंस्थेला सांगितले, "मी बाबा आणि बहिणींसोबत घरातच होतो. मला झोप येत नव्हती, म्हणून मी मोबाइल पाहत होतो. तेव्हाच वडील बाथरूमसाठी बाहेर गेले. ते बाथरूम करून घरी परत आले, तेव्हा त्यांनी ओळीनं सर्वांना आधी फासावर लटकवले. आधी त्यांनी तिन्ही बहिणींना फासावर लटकवले आणि नंतर स्वतःही फासावर लटकले. पण मी आणि माझा धाकटा भाऊ गळ्यातील दोरी काढून खाली उतरलो आणि वाचलो. बाकी सर्वांचा मृत्यू झाला."

भयानक कृत्यामागील कारण काय?

या चार जणांच्या आत्महत्येची माहिती मिळताच सकरा पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ची टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे. हा पूर्ण प्रकार आत्महत्या आहे की, पोलिस तपासात आणखी काही समोर येते, हे पाहावे लागेल. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. वडील अमरनाथ राम यांनी आपल्या मुलांना फासावर का लटकवले आणि नंतर स्वतःही जीव का दिला, याचे कारणही समजू शकलेले नाही.

पोलिस या दिशेनेही तपास करत आहेत की, हे प्रकरण अंधश्रद्धेशी संबंधित तर नाही ना? दिल्लीतील बुराडी आणि इतर अनेक ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र फाशी घेतल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.

अमरनाथ राम यांच्या पत्नीचे 1 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून अमरनाथ राम मानसिकदृष्ट्या त्रस्त होते, असे सांगितले जात आहे.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com