Tejasvee Ghosalkar To Join BJP : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आज त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाला धक्का...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र आता अखेर एकदा तेजस्विनी घोसाळकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं
तेजस्वी घोसाळकर यांचा आज भाजपप्रवेश?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, आज सकाळी १० वाजता वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा सर्वात मोठा जबर धक्का मानला जात आहे.
Nitin Nabin: भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले नितीन नवीन कोण आहेत? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world