Shocking news: धक्कादायक! 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, मदतीच्या बहाण्याने केलं कृत्य

पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात ही माणूसकीला काळिमा फासणारी आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे‌.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड येथे ८० वर्षीय महीलेवर २८ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केले
  • आरोपीने मदतीच्या बहाण्याने तिला घरात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली आणि लैंगिक अत्याचार केले
  • तिच्या आरडाओरडीने परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले आणि तिला आरोपीच्या तावडीतून मुक्त केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

तरुण,महिला, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यात एक एक अशा घटना समोर येत आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठे ना कुठे महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. हे कमी म्हणून की काय छत्रपती संभाजी नगरच्या पाचोड इथून एक अत्यंत धक्कादायक आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एका 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पैठण तालुक्यातील पाचोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड इथल्या कल्याणनगर परिसरात पिडीत वृद्ध महीला राहते. सोमवारी दुपारच्या वेळी या भागात जोरात वारा सुटला होता. त्यात ही महीला अडकली होती. त्याच वेळी तिथे रोहन आहेर हा नराधम होता. त्याने महीलेची स्थिती पाहीली. त्याच वेळी तिचा गैरफायदा घेण्याचं त्याने ठरवलं. त्याने तिला मदत करतो असं सांगितलं. तिला ही त्याचा आधार वाटला. पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही तिने केली नसेल. मदतीच्या बहाण्याने तो तिला आपल्या घरात घेवून गेला. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: लुप्त झालेलं गाव धरणाच्या पोटातून बाहेर आलं, गावकरी झाले भावूक, गाव पाहण्यासाठी मोठी गर्दी

घरात गेल्यानंतर रोहनने  त्या वृद्ध महीले सोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार ही केले. यावेळी तीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडी ऐकून परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकांनी रोहनच्या तावडीतून त्यांना सोडवले. याबाबत माहिती महीलेच्या नातेवाईकांना देण्यात आली. ते ही तिथे उपस्थित झाले. त्यानंतर तिला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.

नक्की वाचा - Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! जूनच्या पहिल्या आठवड्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, त्या राशी कोणत्या?

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात ही माणूसकीला काळिमा फासणारी आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे‌. या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. तरुणी मुली असुरक्षित आहेतच पण आता वृद्ध महिलांवर ही अत्याचार होत आहे. कायद्याचा कुणाला धाक राहीला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोपी तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे.