जाहिरात

Shocking news: 3 वेळा गर्भपात, प्रेम विवाह मग 1 महिन्याचा संसार, पण पुढे आला खतरनाक ट्वीस्ट

पीडितेने सांगितले की, ती जेव्हा सासरी राहायला गेली, तेव्हा तिच्या सासूने आणि दिराने तिला जेवणही दिले नाही.

Shocking news: 3 वेळा गर्भपात, प्रेम विवाह मग 1 महिन्याचा संसार, पण पुढे आला खतरनाक ट्वीस्ट
  • मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सात वर्षांच्या प्रेमानंतर विवाह झालेल्या तरुणीचा नवरा बेपत्ता झाला
  • तरुणीने तक्रार केली की विवाहाआधी नवऱ्याने तिला तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते
  • नवऱ्याच्या या वर्तनामुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

प्रेमात कधी कोणाला कसा धोका मिळेल हे सांगता येत नाही. पण प्रेम केलं, लग्न केलं त्यानंतर ही जर कुणाला धोका मिळत असेल तर? तुम्हाला ही हे थोडं वेगळं वाटेल. असं असलं तरी अशीच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी परिसरात घडली आहे. इथं एक तरुण आणि तरुणी एकमेकांच्या प्रेमात होते.  जवळपास सात वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. पण यात खरा ट्वीस्ट पुढे आला. त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. लग्न झाल्याच्या एक महिन्यानंतर विवाहीत तरुणीचा नवराच गायब झाला आहे. तो शोधूनही सापडत नाही. या विरोधात तरुणी पोलीस स्थानकात गेली आहे. तिथे जावून तिथे काही धक्कादायक खुलासे केले आहेत.  

पीडित तरुणीचे 2019 पासून खजरी येथील एका तरुणावर प्रेम होते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाचा दबाव टाकल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरात दोघांचा विवाह झाला. या विवाहाचे फोटो आणि पुरोहितांचे पत्र तिने पुरावा म्हणून सादर केले आहेत. लग्ना आधी तरुणीचे प्रियकराने वारंवार शारिरीक शोषण केले होते. त्यातून ती गर्भवती ही राहीली होती. एक नाही तर तीन वेळा ती गर्भवती राहील्याचा तिचा दावा आहे. गर्भवती राहील्यानंतर प्रत्येक वेळी तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले होते. तरुणाने औषध देऊन तीन वेळा तिचा गर्भपात केल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे.  

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

तीन वेळा सक्तीने गर्भपात केल्यानंतर विवाह करणाऱ्या पतीने अवघ्या काही महिन्यांतच पत्नीला वाऱ्यावर सोडले. तो आता बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे. लग्नानंतर पतीने तिला घराबाहेर काढले होते. याबाबत तरुणीने लांजी पोलीस ठाण्यात दोन-तीन वेळा तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. सासरच्या मंडळींकडून पैसे घेऊन पोलीस प्रकरण दडपत असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. एसपींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी तिची आता मागणी केली आहे.

नक्की वाचा - लग्न मंडपात नवऱ्याचं तांडव!, बायकोला लाथ मारली, सासऱ्याला फटकवलं, हायव्होल्टेज ड्राम्याची इन साईड स्टोरी

पीडितेने सांगितले की, ती जेव्हा सासरी राहायला गेली, तेव्हा तिच्या सासूने आणि दिराने तिला जेवणही दिले नाही. प्रकृती बिघडल्यानंतर तिला 108 रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पतीने तिला दोन दिवस बस स्थानकावर बसवून ठेवले. त्यानंतर तो तिथून पसार झाला. आता सासरचे लोक तिला घरात घेण्यास नकार देत असून तिचे सामान रस्त्यावर फेकून तिला मारहाण केली जात आहे असं तिचं म्हणणं आहे. "माझे पती कुठे आहेत हे सासरच्यांना माहित आहे, पण ते त्यांना लपवून ठेवत आहेत," असा आरोप पीडितेने केला आहे. लांजी पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर तिने एसपी कार्यालय गाठले. एका असाहाय्य तरुणीचा हा लढा आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com