जाहिरात

लग्न मंडपात नवऱ्याचं तांडव!, बायकोला लाथ मारली, सासऱ्याला फटकवलं, हायव्होल्टेज ड्राम्याची इन साईड स्टोरी

त्याच वेळी आपल्या मुलीचा बचाव करण्यासाठी वडील सत्रोहन पुढे सरसावले. त्यानी नवरदेवाला रोखण्याचा प्रयत्न केला.

लग्न मंडपात नवऱ्याचं तांडव!, बायकोला लाथ मारली, सासऱ्याला फटकवलं, हायव्होल्टेज ड्राम्याची इन साईड स्टोरी
  • उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लग्न सोहळ्यात नवरदेवाने जयमाला दरम्यान नवरीला लाथ मारली
  • मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवरदेवाने सासऱ्यालाही मारहाण केली, ज्यामुळे वधूपक्ष संतप्त झाला
  • वधूपक्ष आणि नवरदेवाच्या वऱ्हाड्यांमध्ये लोखंडी पाईप आणि खुर्च्यांनी जोरदार हाणामारी झाली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Shocking news: लग्नाची सर्व तयारी झाली होती. पाहुणे मंडपात एकत्र आले होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्न लागणारच होतं. नवरा नवरी मंडपात एकमेकांच्या गळ्यात हार घालणारच होतं. त्याच वेळी तिथे एक हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्याने सर्वच जण हादरून गेले. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही सर्वांाच धक्का देणारी घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचं प्रकार समोर आला आहे. जयमाला विधी सुरू असतानाच मद्यधुंद नवरदेवाने राडा घालत नववधूला लाथ मारली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आपल्या सासऱ्यालाही बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे संतापलेल्या वधूपक्षाने नवरदेवासह वऱ्हाड्यांना चांगलाच धडा शिकवला.

मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच जिल्ह्यातून गणेशपूर येथे ही लग्नाची मंडळी आली होती. सुरुवातीला स्वागत सत्कार शांततेत पार पडला. मात्र, रात्री 11 च्या सुमारास जेव्हा नवरदेव विशाल मंचावर चढला, तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता. नवरीला जयमाला घालताना अचानक त्याने आपली होणारी पत्नी निशा हिला लाथ मारली. हा प्रकार पाहून उपस्थितांना धक्का बसला. त्याने असं का केलं हे अनेकांना समजलंच नाही. सर्व जण पाहातच राहीले. काय होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. 

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

त्याच वेळी आपल्या मुलीचा बचाव करण्यासाठी वडील सत्रोहन पुढे सरसावले. त्यानी नवरदेवाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र  नवरदेवाने त्यांच्यावरही हात उचलला. त्यांना ही जबर मारहाण केली. यामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी वधूपक्षाच्या मदतीने नवरदेवाला जबर चोप दिला. लोखंडी पाईप आणि खुर्च्यांचा वापर करून दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. ज्यामध्ये नवरदेवाचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. नवरदेवाला ही जबर चोप देण्यात आला. यामुळे लग्न मंडपात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.   

नक्की वाचा - Beed News: 'कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा...', संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंतचा हादरवून सोडणारा खुलासा

नवरदेव विशाल नशेत इतका धुंद होता की त्याला आपण कुठे आहोत याचे भान उरले नव्हते. जयमालेचा विधी सुरू असतानाच त्याने नवरीला मारलेली लाथ पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता, नवरदेवाने त्यांनाही सोडले नाही. या घटनेनंतर लग्नमंडपाचे रूपांतर युद्धभूमीमध्ये झाले. वधू आणि वर पक्षाचे लोक एकमेकांवर तुटून पडले. टेंटमधील डझनभर खुर्च्या तोडल्या गेल्या. हा गोंधळ पाहून लग्नाला आलेले पाहुणे मिळेल त्या वाटेने पळताना दिसले. या मारहाणीत अनेक जण रक्तबंबाळ झाले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com