जाहिरात

Shocking News: सुंदर मॉडेल, लिव्ह इन अन् लव्ह जिहाद!, प्रेग्नंसी आधी 'हेझिटेशन कट', हादरवून टाकणारं प्रकरण

याचा शोध घेताना पोलीसांना काही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.

Shocking News: सुंदर मॉडेल, लिव्ह इन अन् लव्ह जिहाद!, प्रेग्नंसी आधी 'हेझिटेशन कट', हादरवून टाकणारं प्रकरण

Khushbu Ahirwar model: खुशबू अहिरवार उर्फ खुशबू वर्मा ही  27 वर्षीय मॉडेल. सध्या खुशबूचं प्रकरण गाजत आहे.  त्याला कारण ही तसेच आहे. ते म्हणजे खुशबू वर्माचा संशयास्पद मृत्यू. मात्र तिच्या या मृत्यूनंतर ही अनेक रहस्ये उघड झाली आहेत. तिच्या हातावर 'हेझिटेशन कट' (Hesitation Cut) चे जुने निशाण आढळले आहे. यातून तिने  वर्षभरापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता तिचा अचानक आणि संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये खळबळ उडाली आहे. याचा शोध घेताना पोलीसांना काही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. 

खुशबू वर्माचा मृत्यू आणि 'हेझिटेशन कट'
9 नोव्हेंबर 2025 रोजी खुशबूची तब्येत अचानक बिघडली होती. त्यावेळी तिचा लिव-इन पार्टनर कासिम तिला भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयाच्या डॉक्टर इरा दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणण्यापूर्वीच खुशबूचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या हातावर जुने कट (Hesitation Cut) आढळले. हे कट सहसा आत्महत्येचा प्रयत्न करताना लागतात. ते वर्षभर जुने होते. यामुळे खुशबूने यापूर्वी स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असावा, असे दिसून येते.

नक्की वाचा - Trending News: IAS असलेल्या पत्नीने IAS नवऱ्या विरोधात दाखल केला गंभीर गुन्हा, कारण ऐकून हादरून जाल

मृत्यूचे नेमके कारण अन् प्रेम
खजूरी रस्ता पोलीस स्टेशनच्या अधिकारी दिव्या यांनी पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे सांगितले की, खुशबूच्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे तिची फैलोपियन ट्यूब (गर्भाशय नळी) फाटणे हे होते. ती गर्भवती होती आणि गर्भाशयाच्या नळीला गंभीर गुंतागुंत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. खुशबू (मूळची सागर येथील) आणि तिचा प्रियकर कासिम मूळचा उज्जैनचा होता. जो चहाचे कॅफे चालवतो. यांची भेट तीन वर्षांपूर्वी झाली होती. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  दीड वर्षांपूर्वी ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते.

नक्की वाचा - Shocking: सर्वाधिक आळशी लोक राहणारे जगातील देश कोणते? टॉप 10 यादीत भारताचा क्रमांक कितवा?

कासिमवर 'लव्ह जिहाद'चा गुन्हा
खुशबूची बहीण काजल हिच्या तक्रारीनुसार, कासिमने स्वतःची ओळख 'राहुल' अशी करून खुशबूशी मैत्री केली होती. नंतर तो तिच्यावर धर्म परिवर्तन करून लग्न करण्याचा दबाव टाकत होता. तसेच, तो खुशबूला मारहाणही करत असे. या आरोपानंतर पोलिसांनी कासिमविरुद्ध 'लव्ह जिहाद', SC/ST कायदा आणि मारहाण अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र  खुशबूचा मृत्यू एक गुढ बनले आहे. ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू याचा तपास आता पोलीस करत आहे. मात्र एक पुढे येणाऱ्या तरूण मॉडेलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यात आता या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल आला आहे. त्यामुळे तपासाची दिशाही बदलणार आहे. 

नक्की वाचा - Foreign Travel: परदेशवारी करा फक्त 1000 रूपयात! कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी 'हे' 3 सुंदर देश

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com