जाहिरात

Shocking news: 15 वर्षांची तरुणी, फेसबूकवर मैत्री, मोबाईलवर बोलताना पकडले, पुढे भयंकर घडले

तिची दोन महिन्यापूर्वी एका मुला सोबत फेसबूकवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री झाली.

Shocking news: 15 वर्षांची तरुणी, फेसबूकवर मैत्री, मोबाईलवर बोलताना पकडले, पुढे भयंकर घडले
  • रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील १५ वर्षीय मुलगी सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलासोबत सतत संवाद साधत होती
  • मुलीच्या घरच्यानी तिला रात्री उशिरा फोनवर बोलताना पकडले. त्यामुळे ती घाबरली.
  • मुलीने घरामध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
रायगड:

मेहबूब जमादार 

हल्ली मुलांच्या हातात मोबाईल द्यावा की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या मोबाईलचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यात सोशल मीडियावर अनेक मुलं मुली तासन तास आपला वेळ घालवत असतात. त्यातून काही चुकीच्या गोष्टी ही घडतात. अशीच एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडली आहे. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. या घटनेत एक 15 वर्षांच्या तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. 

म्हसळा तालुक्यातील वरवटणे बौद्धवाडी इथं एक 15 वर्षीय शाळकरी मुलगी राहत होती. तिची दोन महिन्यापूर्वी एका मुला सोबत फेसबूकवर ओळख झाली होती.  त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री झाली. दोघे ही सतत फेसबूकवर बोलत असत. शुक्रवारी रात्री ही मुलगी त्या मुलासोबत बोलत होती. रात्री उशिरा मुलगी फोनवर बोलते हे तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. तिची चोरी पकडली गेली होती. हे तिला ही समजले. आता पुढे काय होणार याचा विचार तिच्या मनात घोळत होता. ती घाबरून गेली होती. पुढे काही होणार तर नाही ना असं तिला वाटत होते. 

नक्की वाचा - Pune News: सुनेत्रा पवारांविरोधात 'या' उमेदवाराने थोपटले दंड, अर्ज केला दाखल, आता निवडणूक अटळ

घरचे आता आपल्याला ओरडणार असं तिला वाटत होतं. या भितीने ती कावरीबावरी झाली. पुढे तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने घरामध्येच वाश्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार घरच्यांनी पाहिला. ते पाहून त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ मुलीला खाली उतरवले. त्यानंतर  उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासले. त्यानंतर  तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे हे करीत आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा - तामिळनाडू विधानसभेत कोणाचं पारडं जड? सर्वांनाच चक्रावणारा सर्वे आला समोर, DMK,AIADMK की TVK?

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरचे ओरडतील या भिती पोटी या अल्पवयीन मुलीने आपले आयुष्य संपवले. अशा स्थितीत लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या आहारी तरुणी पिढी जात आहे. त्यात अल्पवयीन मुलांचा आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातूनच ही घटना घडली आहे. या घटनेनं संबंधीत मुलीचं कुटुंब पार हादरून गेलं आहे. आपल्या मुलीसोबत हे काय झालं असा प्रश्न त्यांनाच पडला आहे. असा स्थितीत मुलांना विश्वासत घेणं खुप गरजेचं बनलं आहे.  
  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com