- तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे
- लोक पोलच्या अंदाजानुसार मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल
- DMKच्या लोककल्याणकारी योजना आणि ग्रामीण भागातील महिला मतदारांचा पाठिंबा स्टालिन यांच्या बाजूने आहे
Tamil Nadu Assembly Election: तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे इथले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी विविध संस्थांचे 'प्री-पोल' सर्वे समोर आले आहेत. 'लोक पोल' आणि 'पोल ट्रॅकर' या दोन्ही संस्थांच्या अंदाजानुसार, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तसे झाल्यास स्टॅलिन मुख्यमंत्रीपदाची हॅट्रीक करतील. स्टॅलिन यांच्या सोबत काँग्रेसचा ही फायदा होताना तामिळनाडूमध्ये दिसत आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या अभिनेता विजयला ही फायदा होताना दिसत आहे.
लोक पोलच्या अंदाजानुसार, एकूण 234 जागांपैकी DMK आघाडीला 181 ते 189 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा मतांचा टक्का 40.1 टक्के इतका राहू शकतो. महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि नाश्ता योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा DMK ला मोठा फायदा होताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला मतदारांचा कल स्टालिन यांच्या बाजूने असल्याचे सर्वेतून स्पष्ट झाले आहे. DMK मुळे काँग्रेसला ही फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे डीएमके प्रणित इंडिया आघाडी मोठ्या बहुमतासह तामिळनाडूत सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वेनुसार विजय यांच्या पक्षाला 23.9 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांच्या पक्षाच्या पदरात 8 ते 10 जागा मिळू शकतात असे सर्वेमध्ये दिसून आले आहे. तरुणाई आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये विजय यांची मोठी क्रेझ दिसून येत आहे. त्यामुळे हा मतदार विजय यांच्या पारड्यात मत टाकू शकतो. असं असलं तरी विजय यांना सत्तेचं सोपान काही चढता येणार नाही. पहिल्याच निवडणुकीत मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.
दुसरीकडे, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK ची या निवडणुकीत ही वाताहत होताना दिसत आहे. त्यांना केवळ 38 ते 42 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत कलह आणि प्रमुख नेत्यांची गळती यामुळे एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाची कामगिरी खालावल्याचे चित्र आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी ही घसण्याची शक्यता आहे. भाजप सोबत केलेली युती, पक्षांतर्गत नाराजी, अनेक नेत्यांनी सोडलेली साथ याचा फटका AIADMK ला बसणार असे सर्वेतून दिसत आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्व्हेमध्ये डीएमके आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. एम. के. स्टालिन हेच मुख्यमंत्रिपदासाठी जनतेची पहिली पसंती ठरले आहेत. लोक पोलच्या अंदाजानुसार, सत्ताधारी आघाडीला 40.1% मते मिळतील, तर विरोधी एआयएडीएमकेला केवळ 38-42 जागांवर समाधान मानावे लागेल. नवीन पक्ष असलेल्या टीव्हीकेला (TVK) 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुदलियार, नायडू आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा स्टालिन यांच्या पाठीशी असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री होवू शकतात असे सर्वे सांगत आहेत.
The most wanted #TamilNadu Survey is Out!
— Lok Poll (@LokPoll) April 1, 2026
Here's the vote share & seat projection from our mega ground survey:
▪️DMK+ 181–189 | 40.1%
▪️ADMK+ 38–42 | 29%
▪️TVK 8–10 | 23.9%
▪️NTK 00 | 4.9%
▪️Others 00 | 2.1%
Sample size:… pic.twitter.com/5CuGQMwKpP
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world