- माजी एनएसजी कमांडो रतन सिंहला जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे
- आरोपीने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारातून कोट्यवधी रुपये कमावले होते
- रतन सिंहने आपल्या भावाच्या नावावर जवळपास सहा कोटी रुपयांच्या किमतीचा आलिशान बंगला खरेदी केला होता
एनएसजी कमांडो म्हणजे देशाचा अभिमान. अतिशय खडतर प्रयत्नानतर एनएसडी कमांडो होता येतं. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण मोहिमा फत्ते करण्याची जबाबदारी याच NSG कमांडोंवर असते. एनएसडी कमांडो म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो काळा पेहराव, अत्याधुनिक शस्त्रे आणि विद्यृत वेगाने चपळाई. मात्र, याच दलात देशसेवा बजावलेला एक माजी कमांडोने मोठा कांड केला आहे. त्याचा हा कांड पाहून पोलीसही चक्रावले आहेत. या एनएसडी कमांडोने कोट्यवधीची माया गोळा केली होती. इतके पैसे की त्याच ढिग त्याच्या घरात सापडला होता. त्याल अटक करण्यात आली आहे. पण तो हे पैसे ज्या मार्गाने कमवत होता ते अधिक धक्कादायक आणि संतापजनक आहे.
हा NSG कमांडो चक्क अमली पदार्थांचा मोठा तस्कर बनला होता. तो मुळचा राजस्थानचा आहे. तिथूनच तो हे रॅकेट पूर्ण पणे चालवत होता. जोधपूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत याला अटक करण्यात आली आहे. माजी एनएसजी कमांडो रतन सिंह असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रतन सिंह याने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारातून प्रचंड संपत्ती कमावली होती. त्याने आपल्या भावाच्या नावावर एक आलिशान बंगला खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये आहे. डीसीपी (ईस्ट) मनीष चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
आरोपी रतन सिंह हा मूळचा राजस्थानच्या रतकुडिया येथील रहिवासी आहे. तो आधी आसाम रायफल्समध्ये जवान होता. त्यानंतर त्याची निवड एनएसजीमध्ये झाली होती. पोलिसांनी गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत त्याच्याकडून 1 कोटी 6 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याच्याकडून 8 किलो अफीमचे दूध (दूध स्वरूपातील अफीम) आणि एक क्रेटा कार जप्त केली आहे. त्याच्या घरात जी कॅश आढळली ती 500 रूपयांच्या नोटांमध्ये होती. या नोटांच्या बंडलांचा ढिग त्याच्या घरात होता. हा ढिग पाहून पोलीसही चक्रावून गेले होते. ते पैसे मोजण्यासाठी ही बराच वेळ लागला. सैन्यात असलेल्या या कमांडोने असं का केलं त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान तो ड्रग्ड कोणाला पुरवत होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
राजस्थानमध्ये माजी एनएसजी कमांडोने अशा पद्धतीने ड्रग्जची तस्करी करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी ही अशीच घटना समोर आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बजरंग सिंह नावाच्या एका माजी एनएसजी कमांडोलाही अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. बजरंग सिंहने मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढा दिला होता. तसेच बीएसएफमध्ये असताना नक्षलवाद्यांचा मुकाबला केला होता. मात्र, नंतर तो ओडिशा, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या बनला. ही घटना समोर आल्यानंतर ही राजस्थानमध्ये खळबळ उडाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world