लग्नाचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जाते. तर या नात्याच्या आड काहींची आर्थिक लुट ही होते. पण काही नराधम असेही असतात ते त्याच्या ही पुढे जावून भयंकर कृत्य करतात. अशीच एक धक्कादायक आणि तितकीच चिड आणणारी घटना रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये घडली आहे. इथं एका विवाहीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आलं. मात्र त्यानंतर तिच्या आयुष्यात जे काही झालं त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. हे प्रकरण ज्यावेळी समोर आले त्यावेळी पोलीसांच्याही पाया खालची वाळू सरकून गेली.
उरण जवळच शेरघर नावाचं गाव आहे. इथं एक विवाहीत महिला राहात होती. या महिलेला एक तरुणी मुलगी ही आहे. या विवाहीत महिलेच्या आयुष्यात एक तरुण आला. दोघांची ओळख घट्ट होत गेली. दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे इतके जवळ आले की ते एकमेकांना नवरा बायको समजू लागले. त्यांनी सर्व हद्द ओलांडल्या होत्या. ते वाहत गेले. विशेष म्हणजे विवाहीत महिला तो लग्न करणार म्हणून कसला ही विचार करत नव्हती. दोघांमध्ये जवळपास एक वर्ष शरिर संबंध प्रस्तापित झाले होते. तो सांगेल ती पूर्व दिशा असच सर्व होतं होतं. तिचा त्याच्यावर आंधळा विश्वास होता. विश्वास जिंकल्यानंतर या तरुणाने आपला डाव खेळला.
पुढे या तरुणाने त्या विवाहीत महिलेकडे हळूहळू पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. तिने ही कसलाही विचार न करता तो मागेल तेवढे पैसे त्या तरुणाला ती देत गेली. जवळपास 12 लाख 35 हजार रूपये त्या महिलेने त्या तरुणाला दिले. त्यातून त्याने महागड्या वस्तू स्वत:साठी घेतल्या. त्याचे आता तेवढ्यावर भागत नव्हते. त्याची नजर आता त्या विवाहीत महिलेच्या तरूण मुलीवर ही पडली. त्याने मग तिलाही आपल्या कवेत घेतले. ऐवढेच नाही तर तिचे ही लैंगिक शोषण केले. आधी त्याने त्या विवाहीत महिले सोबत शरिर संबंध केले. त्यानंतर त्याने तिच्या मुली सोबत ही शरिर संबंध ठेवले.
संबंधीत आरोपीने नोव्हेंबर 2024 पासून नोव्हेंबर 2025 पर्यंत पीडितेच्या घरी जाऊन हे कृत्य केलं. शिवाय तो वारंवार तिला लग्नाचे आमिष ही दाखवत होता. महिला सारखी लग्नासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे आता आपली चोरी पकडली जाणार हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपलं बींग फुटू नये म्हणून त्याने त्या दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली. जर माझ्या बद्दल काही बोललात तर याद राखा अशी त्यांना धमकी दिली. त्यामुळे त्या दोघी ही प्रचंड घाबरल्या होत्या. आपण फसवल्या गेलो आहोत हे त्या दोघींनाही समजले. आपल्या मुली सोबत ही त्याने चुकीचे केले आहे हे तिला समजल्यावर तर ती आणखीनच हादरली.
शेवटी दोघींनी ही हिंमत करून त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दोघींनी ही उरण पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी झालेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला. पोलीस ही आवाक झाले. झालेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी ताडीने कारवाई केली. आरोपीची माहिती गोळा करून त्याता अटक ही केली. त्याच्या विरोधात गुन्हा ही दाखल झाला आहे. त्याला कोर्टात सादर करून पुढे कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीसांनी पीडित महिलेला दिलं आहे.