जाहिरात

Dress code: बुरखा घालण्यास नामांकीत कॉलेजमध्ये बंदी! मुस्लीम तरुणींचा विरोध, कॉलेज बाहेरच जोरदार राडा

पण खरा वाद झाला तो धार्मिक ओळख दर्शवणारे कपडे घालण्यास बंदी घातल्यावरून.

Dress code: बुरखा घालण्यास नामांकीत कॉलेजमध्ये बंदी! मुस्लीम तरुणींचा विरोध, कॉलेज बाहेरच जोरदार राडा
मुंबई:

सागर कुलकर्णी 

कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी आचार संहिता जाहीर केली होती. त्यानंतर मोठा राडा झाला. ही घटना मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये घडली आहे. मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेला असलेल्या विवेक विद्यालय आणि ज्यूनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांसाठी CODE OF CONDUCT तयार केला आहे. त्यात त्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणते कपडे घालू नयेत याची अचार संहिता केली आहे. त्यात मुस्लीम विद्यार्थीनींसाठी ही ड्रेस कोड देण्यात आला आहे. त्यात बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. 

विवेक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्रा पासून ते अगदी कोणते कपडे घालायचे इथ पर्यंत सर्व नियम जाहीर केले आहे. कपड्यांबाबत कॉलेजने म्हटले आहे की  विद्यार्थ्यांनी संस्थेने स्थापित केलेल्या पोषाख संहितेचे (Dress Code) काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी कॅम्पसमध्ये योग्य आणि मर्यादित (Appropriate and Modest) कपडे परिधान करणे अपेक्षित आहे. त्यानुसार मुलांसाठी फॉर्मल हाफ किंवा फुल शर्ट आणि ट्राउझर्स, टी-शर्ट्स/जीन्स घालण्याची मुभा दिली आहे. 

नक्की वाचा - Solapur News: गर्भवती तरुणी X-ray काढण्यासाठी रुग्णालयात आली, एक्स रे काढण्याच्या नावावर तिच्या सोबत...

तर मुलींसाठी कोणताही योग्य भारतीय किंवा पाश्चात्त्य पोषाख (Any appropriate Indian or western outfit) घालण्याची मुभा देण्यात आली आहे. तर केस कसे असावेत यासाठी ही मुलींना नियम लावण्यात आले आहेत. मुलांनी व्यवस्थित हेअरकट (Proper haircut) ठेवणे आवश्यक आहे. मुलींनी त्यांचे केस नेहमी बांधलेले (Tied up) ठेवणे आवश्यक आहे असं कॉलेजने स्पष्ट केलं आहे. तर कोणत्याही मुलीला स्लीव्हलेस टॉप्स (Sleeveless tops), शॉर्ट टॉप्स, जर्सी, शॉर्ट ड्रेसेस, शॉर्ट टी-शर्ट्स, अंगचट (Body-hugging) टॉप्स, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स (Ripped jeans), किंवा कोणताही अयोग्य वाटणारा (inappropriate) अंगप्रदर्शन करणारा पोषाख (revealing attire) परवानगी दिली जाणार नाही अस कॉलेजने सांगितलं आहे. 

नक्की वाचा - Bharat Taxi: आता Ola-Uber ला विसरा, 'भारत टॅक्सी' वापरा! स्वस्त अन् मस्त सरकारी टॅक्सी सेवा सुरू

पण खरा वाद झाला तो  धार्मिक ओळख दर्शवणारे कपडे घालण्यास बंदी घातल्यावरून. कॉलेजने स्पष्ट केले की  धार्मिक किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारे कपडे कॉलेजमध्ये घालता येणार नाहीत. त्यात बुरखा (Burqa), निकाह (Niqab) इत्यादी धार्मिक ओळख दर्शवणारे कपडे घातला येणार नाहीत. असे कपडे वर्गात प्रवेश करण्यापूर्वी काढणे आवश्यक आहे. मात्र, हिजाब (Hijab) घालण्यास मुलींना परवानगी आहे, असं ही कॉलेजने स्पष्ट केलं. मात्र त्यानंतरच खरा वाद निर्माण झाला. कॉलेजच्या या निर्णयाला मुस्लीम तरुणींनी विरोध केला. त्यांनी कॉलेज बाहेरच ठिय्या आंदोलन केले. शिवाय कॉलेजने काढलेले हे परिपत्रक मागे घ्यावे. ही बंधन हटवावी अशी मागणी त्यांनी केली. आम्ही आमचे चेहरे झाकले आहेत आम्ही आमचे मेंदू झाकून ठेवलेले नाहीत असं या विद्यार्थीनींचे म्हणणे होते. 

नक्की वाचा - Toll Tax Relief: टोल बाबत नितीन गडकरींनी संसदेत दिली 'गुड न्यूज' म्हणाले आता 1 वर्षात देशात टोल...'

आंदोलना वेळी काही मुस्लीम तरूणही या ठिकाणी जमा झाले. त्यांनी ही या निर्णयाचा विरोध केला. शिवाय हा निर्णय मागे घेतला जावा अशी मागणी केली. यावेळी कॉलेज बाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वाढता गोंधळ लक्षात घेता पोलीसांना पाचारण करण्यात आलं. पोलीसांनी आंदोलन करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेतलं. त्यामुळे तुर्तास तरी हा वाद शांत झाला आहे. पण अन्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी काय घालावे हे ही यात आहे. त्यामुळे त्यांच्या ही नाराजीला कॉलेज प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान हा निर्णय कॉलेजच्या सुरक्षेसाठी घेतला असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com