Shocking news: इंस्टाग्राम LIVE करून टोकाचं पाऊल, 10 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणीनं भयंकर केलं

आत्महत्येपूर्वी पीडित तरुणीने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील 22 वर्षांच्या तरुणीने ब्लॅकमेलिंगमुळे आपले जीवन संपवले आहे
  • आरोपी तरुणाने जुन्या प्रेमसंबंधांचा आधार घेत खासगी व्हिडिओ तिला आणि तिच्या पतीला पाठवले होते
  • पीडितेने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे आपली व्यथा मांडली आणि मानसिक तणावामुळे गळफास घेतला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेलिंगमुळे आपले जीवन संपवावे लागले आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली. जुन्या प्रेमसंबंधांचा आधार घेऊन एका तरुणाने पीडितेचे खासगी व्हिडिओ तिच्या पतीला पाठवले, ज्याचा विपरित परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर झाला. या जाचाला कंटाळून तिने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे आपली व्यथा मांडली. त्यानंतर राहत्या घरी गळफास घेतला. पोलिसांनी याप्रकरणी मोबाईल आणि व्हिडिओ पुरावा म्हणून ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदरी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी पीडित तरुणीने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे लग्न 10 महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र, लग्नानंतरही गावातीलच एक तरुण तिला जुन्या संबंधांच्या आधारे सतत ब्लॅकमेल करत होता. गुरुवारी रात्री पीडितेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये तिने आरोपीवर गंभीर आरोप केले. आरोपीने तिचे काही खासगी व्हिडिओ तिच्या पतीला पाठवले होते, ज्यामुळे तिचा संसार मोडला आणि ती प्रचंड मानसिक तणावात होती, असे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Beed News: वय वर्ष 19, लग्न झाली 8, देखण्या तरुणीचं 9 वं लग्न, पण पुढे जे घडलं त्याने नवरदेव ढगात

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपी तरुण त्यांच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला सतत त्रास देत होता. त्याने मुलीचे वारंवार शारीरिक शोषण केले. समाजात बदनामी करण्याची भीती दाखवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. या तणावातूनच तिने आपल्या माहेरी गळफास लावून घेतला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा - D Mart Secret: डी-मार्टमध्ये शॉपिंग करताय? 'या' टिप्स फॉलो करा, 5 हजारांचे बिल होईल 2 हजार

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांदरी पोलीस स्टेशनवर मोर्चा वळवला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. दरम्यान, बांदरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सुमेर सिंह जगेत यांनी सांगितले की, "पीडितेचा मोबाईल आणि इंस्टाग्राम व्हिडिओ जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, दोषीवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल." असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या तरुणाने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले होते.