- राजस्थानच्या धोलपूर जिल्ह्यात अनैतिक संबंधातून पत्नीने पतीचा खून केला
- शंकर सिंह यांची पत्नी रुबी आणि तिचा भाचा हरेंद्र यांचे अनैतिक संबंध होते
- हरेंद्रने दारू पिण्याच्या बहाण्याने शंकरला शेतात नेऊन विषारी दारू पाजली आणि त्याचा मृत्यू झाला
प्रेमात व्यक्ती कोणत्या ही टोकाला जावू शकतो. त्यात जर अनैतिक संबंध असतील तर त्याला वेगळच वळण मिळतं. त्यातून गुन्हा होतो. आरोपीला वाटतं आपण सर्व काही सुरळीत केलं आहे. सर्व काही सुरळीत वाटत असतानाच एक चुक नडते अन् सर्वाचा पर्दाफाश होतो. अशीच एक धक्कादायक आणि तेवढीच हादरवून टाकणारी घटना राजस्थानच्या धोलपूरमध्ये घडली आहे. इथं एका विवाहीतेचं मन आपल्याच भाच्यावर आलं होतं. पण पती अडसर होता. त्याचा या दोघांनी अतिशय चातुर्याने काटा काढलाय खून पचला ही होता. त्यात त्यांची एक चुक नडली आणि दोघे ही गजा आड गेले. याची चर्चा सध्या सगळीकडेच होताना दिसत आहे.
धोलपूर जिल्ह्यातील भैंसाख हे गाव आहे. या गावात 11 महिन्यांपूर्वी शंकर सिंह याचा गुढ पद्धतीने मृत्यू झाला होता. सुरुवातीला अतिमद्यपानामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याच्या बायकोने ही संपूर्ण गावात तसेच सांगितले होते. त्याला दारूनचे व्यसन असल्यामुळे गावकऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवला होता. प्रत्यक्षात प्रकरण वेगळे होते. शंकर सिंह याची पत्नी रूबी हिचे तिचाच भाचा असलेल्या हरेंद्र सोबत अनैतिक संबंध होते. दोघे ही सर्व नाती विसरून एकमेकाच्या प्रेमात पार बुडाले होते. आता त्यांना शंकर हा आपल्यातला काटा वाटत होता.
नक्की वाचा - Thane News: आईच्या कुशीतून 3 महिन्यांची चिमुकली पळवली, थरारक घटना CCTV मध्ये कैद
त्यातूनच त्यांनी शंकर सिंहचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. शंकरला दारू पिण्याची लत होती. त्याचा फायदा रुबी आणि हरेंद्र यांनी घेण्याचे ठरवले. 15 फेब्रुवारी 2025 रोजी हरेंद्रने मामा शंकर सिंह यांना शेतात नेले. दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेतले. दारू मिळणार म्हणून शंकर सिंह ही भाच्यावर विश्वास ठेवून शेतात गेला. तिथे भाच्याने मामाच्या दारूमध्ये कीटकनाशक मिसळलेली दारू त्याला पाजली. त्याने ही भरपूर दारू प्यायली. त्यानंतर मामाला भाच्याने त्याच्या घरी सोडले. मग तो तिथून निघून गेला.घरी आल्यावर शंकरची प्रकृती खालावली. पण त्याचा त्यात मृत्यू झाला.
त्याच वेळी पत्नी रूबीने अतिदारू सेवनामुळे पतीचा मृत्यू झाल्याची बतावणी केली. त्यावर गावकऱ्यांनी ही विश्वास ठेवला. शंकरच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व विधी करण्यात आले. तेरा दिवसा पर्यंत रूबी घरीच होती. पतीचे सर्व कार्य तिने पार पाडली. त्यानंतर ती भाचा हरेंद्र सोबत गायब झाली. त्या दोघांनी पळून लग्न केलं होतं. इकडे शंकरच्या मृत्यूचे प्रकरण ही शांत झालं होतं. पण त्याच वेळी रूबी आणि हरेंद्रच्या लग्नाची बातमी गावकऱ्यांना समजली. त्याच वेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली. शिवाय शंकरच्या मृत्यूबाबतही शंका उपस्थित केली.
पोलीसांनी ही बरेच दिवस झाल्यामुळे शंकरच्या मृत्यूची फाईल बंद केली होती. पण त्यांनी या घटनेनंतर पुन्हा चौकशी केली. त्याच्या मृत्यूचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला. त्यामध्ये सर्वांना हादरवून टाकणारा अहवाल समोर आला. सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. शंकर सिंह याचा मृत्यू विषारी कीटकनाशकामुळे झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी रुबी आणि भाचा हरेंद्र यांना ताब्यात घेतला. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. शिवाय खून कसा केला हे ही सांगितले.