Trending News: 10 वी नापास मेहूणीवर जीव जडला , भावोजीनं भलताच प्लॅन केला, पण हायहोल्टेज ड्राम्यात ट्वीस्ट

आरोपीचे लग्न 2019 मध्ये झाले होते. पत्नी गर्भवती असतानाही त्याने तिला छळले आणि माहेरी पाठवून दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील एका तरुणाने गर्भवती पत्नीला छळून सोडून दिले
  • आरोपीने मेहुणीसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी पळ काढत असताना नातेवाईकांनी त्याला गोरखपूर-वाराणसी हायवेवर पकडले
  • आरोपीने पत्नीच्या दागिने आणि रोकड घेऊन पळ काढण्याचा कट रचला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण उत्तर प्रदेशातल्या मऊ जिल्ह्यातील एका तरुणाने या म्हणीचा अतिरेकच केला. आपल्या पोटच्या मुलाची आणि पत्नीची पर्वा न करता, हा महाशय 10 वी नापास असलेल्या मेहुणीला घेऊन पळ काढत होता. भर हायवेवर नातेवाईकांनी त्याला फिल्मी स्टाईलने पकडले आणि बेदम चोप दिला. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या विवाहित पत्नीला सोडून, 10 वी नापास असलेल्या अल्पवयीन मेहुणीसोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळींच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. आरोपी पतीला भर हायवेवर पकडण्यात आले.

कोपागंज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या या घटनेत, आरोपी तरुणाचे आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तो तिला घेऊन कोर्ट मॅरेज करण्यासाठी पळून जात होता. याची भनक मुलीच्या नातेवाईकांना लागली. शिवाय हेबाब त्याच्या पत्नीला ही समजली.  त्यानंतर गोरखपूर-वाराणसी हायवेवर नातेवाईकांनी त्यांना गाठले. यावेळी मुलगी शेतात पळून जाण्यात यशस्वी झाली, मात्र आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

नक्की वाचा - Akola News : आईचा प्रियकर रात्री दार उघडायचा आणि...; 8 वर्षांच्या चिमुरडीने बाबांना सांगितला घडलेला प्रकार

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 1019 मध्ये त्यांनी आपल्या मोठ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावून दिले होते. लग्नानंतर काही काळातच त्याने गर्भवती पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर तो वारंवार सासरी येऊ लागला आणि त्याने लहान मेहुणीला जाळ्यात ओढले. घरातील दागिने आणि रोकड घेऊन पळून जाण्याचा त्याचा कट होता. अपर पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांनी याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

नक्की वाचा - Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम

आरोपीचे लग्न 2019 मध्ये झाले होते. पत्नी गर्भवती असतानाही त्याने तिला छळले आणि माहेरी पाठवून दिले. दरम्यान, सासरी चकरा मारत असताना त्याचे लक्ष धाकट्या मेहुणीवर गेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. मऊच्या हायवेवर नातेवाईकांनी पाळत ठेवून त्याला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीडित पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. "त्याने मला कधीच सांभाळले नाही आणि आता माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता," असे तिने रडत सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.