Pune Jain boarding case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट, विकासकांच्या गळ्याचा फास आवळला

मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Jain Boarding Case : मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चक्क बोर्डिंगमधील जैन मंदिरालाच गहाण ठेवून कर्नाटकातील बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या दोन संस्थांकडून विकासक विशाल गोखले आणि पूनम गोखले यांच्या नावे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुलास्यानंतर जैन समाजाच्या संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांकडे धाव घेतली. आज मुंबई येथे धर्मदाय आयुक्तांसमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून निर्णय थोड्याच वेळात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, संध्याकाळी मोठी घडामोड घडली आहे. कर्नाटकातील बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने हवेली तहसीलदारांना पत्र पाठवून जैन मंदिरावरचा बोजा (गहाण हक्क) कमी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते. 

नक्की वाचा - Pune Model Colony : जैन मंदिर गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार; पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा!

जैन समुदायाच्या वसतीगृह संदर्भात नवी घडामोड समोर आली आहे. दोन्ही बँकांना कर्ज परत घेण्याच्या हालचाली सूरू केल्या आहेत. बुलडाणा अर्बन बँकेचे डीडीआरला पत्र देण्यात आले असून आमचा 20 कोटी रूपयांचा बोजा कमी करा अशी सूचना देण्यात आले आहेत. कर्नाटकच्या दुसऱ्या बँकेनेही कर्ज परत घेण्यासाठी पत्र दिले आहे. या सर्व घडामोडींमुळे जैन बोर्डिंग प्रकरण नव्या टप्प्यात प्रवेश करत असून, धर्मदाय आयुक्तांचा निर्णय आता सर्वांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article