Sinner News : सिन्नर तिहेरी जळीतकांडात आणखी एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान सासुनेही सोडला जीव

सिन्नर तालुक्यातील तिहेरी जळीत हत्याकांडात धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Sinner News : नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील तिहेरी जळीतकांडात धक्कादायक बातमी समोर आली आहे. 6 एप्रिल रोजी केदार हंडोरे या तरुणाने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. अशाच अवस्थेत तिने पत्नीला मिठी मारली होती. याशिवाय वाचविण्यासाठी आलेली सासूदेखील या घटनेत जबर भाजली होती. अखेर आज उपचारादरम्यान सासू अनिता शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. एक वर्षापूर्वीच केदार हंडोरे आणि स्नेहल शिंदे यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र दोघांमधील वाद वाढल्याने स्नेहल माहेरी राहायला आली होती. यातच केदार हंडोरे पत्नीच्या माहेरी तिला घेण्यासाठी आला होता. मात्र यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला. यावेळी केदार हंडोरे याने स्वत:ला पेटवून घेतलं आणि पत्नी-सासूच्या अंगावर धावून गेला. यामुळे पत्नी स्नेहल आणि सासू अनिता भाजल्या गेल्या.

नक्की वाचा - Jalgaon News : नदीत बुडालेल्या मुलासाठी आई आणि मावशीची पाण्यात उडी; तिघांचाही मृत्यू

अनिता शिंदे 65 टक्के तर स्नेहल शिंदे 50 टक्के भाजल्या गेल्या. त्याच दिवशी पती केदार हंडोरे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सासू अनिता शिंदे दगावल्या आहेत. पत्नी स्नेहल शिंदेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisement