छोटा भाऊ बुडत होता, बहीण वाचवायला गेली अन् अनर्थ झाला

एकाच वेळी, एकाच घरातील सख्खे बहीण भाऊ यांचा त्यात मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात घडली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
धुळे:

सर्वपित्री अमावस्या निमित्त गावा जवळच असलेल्या तापी नदी पात्रात भाऊ बहिणी बेलपात्र टाकण्यासाठी गेले होते. बेलपात्र टाकून ते घरी परतणार होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. बेलपात्र टाकत असताना 13 वर्षाचा भाऊ नदीत बुडू लागला. भाऊ बुडत आहे हे पाहून बहीण त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावली. पण तिलाही पाण्याचा अंदाज आला नाही. ती ही खोल पाण्यात बुडाली. एकाच वेळी, एकाच घरातील सख्खे बहीण भाऊ यांचा त्यात मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात घडली आहे.     

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

उत्कर्ष रमेश पाटील हा 13  वर्षाचा होता. तो सोनेवाडीत राहात होता. सर्वपित्री अमावस्या असल्याने नदीत तो बेलपात्र वाहण्यासाठी गेला होता. त्याच्या बरोबर त्याची बहीण वैष्णवी सुरेश पाटील वय 17 ही पण होती. गावा जवळच तापी नदी आहे. त्यात उत्कर्ष बेलपात्र वाहात होता. त्याच वेळी त्याचा पाय घसरला. पाय घसरल्याने तो नदी पात्रात पडला. भाऊ पडला हे वैष्णवीने पाहीले. त्यानंतर ती त्याला वाचवण्यासाठी तातडीने पुढे सरसावली. पण तिलाही पाण्याचा अंदाज आला नाही. भावाला वाचवता वाचवता ती ही पाण्यात बुडाली. 

ट्रेंडिंग बातमी - '50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?

यावेळी घटना घडली त्यावेळी काही लोक नदीवर होते. त्यात या दोघांचे काकाही तिथे होते. त्यांनी देखील या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही. शेवटी नदीच्या पात्रातून कसेबसे त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयत त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्या दोघांना तपासल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.