काही दिवसांत निकाह आहे कोणाला कळणार नाही! सख्ख्या भावाच्या अत्याचारामुळे बहीण प्रेग्नंट

UP Crime News :या तरुणीचा निकाह होणार होता. निकाहच्या काही दिवस आधी भावाने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथल्या एका तरुणीने पोलिसांत लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार पाहून पोलीसही हादरले आहेत. कारण या तरुणीने तिच्या सख्ख्या भावाविरोधात लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. या तरुणीचा निकाह होणार होता. निकाहच्या काही दिवस आधी भावाने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केलं. विरोध केला असता त्याने बहिणीला धमकावलं की काही दिवसांत तुझा निकाह होणार आहे, कोणाला काहीही कळणार नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

निकाह झाल्यानंतर ही तरुणी सासरी गेली. काही दिवसांत तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचं कळालं. हे कळताच तिच्या सासरची मंडळी हादरली होती. त्यांनी या तरुणीची चौकशी केली असता तिने सगळा प्रकार सांगितला. यानंतर या तरुणीने पोलिसांत धाव घेतली असून भावाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून भावाला अटक केली आहे. 

Advertisement

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीचं काही महिन्यांपूर्वी लग्न ठरलं होतं. 1 एप्रिल रोजी भाऊ माझ्या खोलीत घुसला होता. खोलीत घुसताच त्याने छेड काढण्यास सुरुवात केली. याला विरोध केला असता भावाने मला पकडले आणि हात पाय बांधले असे तरुणीने सांगितले आहे. यानंतर त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे. विरोध केला असता भावाने म्हटले की, काही दिवसांत तुझं लग्न आहे, कोणा काहीही कळणार नाही. जर कोणाला सांगितलंस तर तुला ठार मारेन. पीडितेने म्हटलंय की सदर प्रकाराची माहिती तने तिच्या आई-वडिलांना दिली होती, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी पोलिसांकडे जाण्यापासून आपल्याला रोखलं होतं असंही तिने म्हटलंय. 

Advertisement

( नक्की वाचा : धक्कादायक! मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून विवाहितेचा घेतला जीव? )

15 तारखेला निकाह, 29 तारखेला गर्भवती 

पीडितेने म्हटलंय की 15 एप्रिलला तिचा निकाह झाला होता. निकाहनंतर ती तिज्या सासरी गेली होती.  काही दिवसांनंतर तिची प्रकृती बिघडली होती. 29 एप्रिलला ती डॉक्टरकडे गेली होती. तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. हे कळताच तिच्या सासरची मंडळी हादरली होती. त्यांनी जेव्हा पीडितेची चौकशी केली तेव्हा त्यांना तिच्या भावाने केलेल्या दुष्कृत्याबद्दल कळालं. 

Advertisement

( नक्की वाचा : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू निघाला धोकेबाज, तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि... )

सासरच्यांनी दिला आधार

सुनेवर झालेल्या अत्याचाराबद्दल कळाल्यानंतर तिच्या सासूने तिला धीर दिला आणि पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं. यामुळे पीडितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी हा मटणाच्या दुकानात कामाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Topics mentioned in this article