Nashik accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

नाशिकमध्ये छोटा हत्ती पिकप आणि आयशरमध्ये अपघात झाला आहे. आयशर गाडी लोखंडी गजांनी भरली होती. तिला मागून येवून पिकअपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा चक्काचुर झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. आयशर गाडी लोखंडी गड घेवून चालली होती.त्याच वेळी मागून पिकचा छोटा हत्ती आला. त्याचा वेग जास्त होता. त्यात प्रवाशीही बसले होते. त्याच वेळी गाडीवरचे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. त्याने मागून थेट गजाने भरलेल्या आयशर गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पीकअप गाडी पुर्ण पणे चेपली गेली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात आहेत. तर दोघांचा मृत्यू खाजगी रुग्णालयात झाला. पाचजण जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे. मृतदेहांची ओळख पटवून शव विच्छेदनासाठी ते पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: धक्कादायक! मुख्याध्यापिकेने 10 वीच्या मुलींना शर्ट काढायला लावले अन् म्हणाल्या आता...

या अपघातातील दोन जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दोघांचा ही मृत्यू झाला आहे. अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे ते आणि जखमी हे सर्व जण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व जण नाशिकच्या सिडको सह्याद्री नगरचे असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement