Solapur Crime: जन्मदात्या आईसोबत मुलाचे अनैतिक संंबंध, मुलीने 'नको त्या अवस्थेत' पाहिलं, पुढे भयंकर घडलं

पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद करतं मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून बापानेच पोटच्या लेकीला संपवल्याची संतापनजक अन् चीड आणणारी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. ओगसिद्ध कोठे असे नराधम बापाचे नाव असून या विकृतीचा कळस गाठणाऱ्या, माय-लेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (ता. 23) संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता.  पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद करतं मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. 

याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता हादरवणारा प्रकार समोर आला. मृत मुलीचे नाव श्रावणी असून तिच्या बापानेच तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले. आरोपी ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. श्रावणीने वडील ओगसिद्ध आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिले होते.

नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात

 हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृत श्रावणी हिला बेदम मारहाण देखील केली. त्यानंतर शुक्रवारी नराधमाने पत्नी वनिता कोठे घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिची गळा दाबून त्याची हत्या केली, त्यानंतर मृतदेह घराच्यासमोरच खड्यात पूरून ठेवले. मात्र गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी प्रशासनाच्यासोबत शुक्रवारी संध्याकाळी हा मृतदेह पुरलेल्या खड्यातून बाहेर काढलेला होता. दरम्यान या घटनेनंतर मंद्रूप पोलीस ठाण्यात आरोपी ओगसिद्ध कोटे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भान्यासं 103(1), 238 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मुलीची आई वनिता कोठेनेही पतीनेच मुलीला संपवल्याचे सांगितले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  PM Modi on Pakistan : 'मोदीचं डोकं थंड, पण रक्त गरम'! पंतप्रधानांनी पुन्हा दिला पाकिस्तानला इशारा )