
PM Modi on Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (22 मे) राजस्थानमधील बिकानेरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज (22 मे) एक महिना पूर्ण झाला आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान म्हणाले, 'पाकिस्तान हे विसरला आहे की, भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे. मोदींचे डोके थंड आहे, पण मोदींचे रक्त गरम आहे.'
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुडाचा खेळ नाही, न्यायाचे नवे रुप
अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही, असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. 'पाकिस्तानसोबत व्यापार (ट्रेड) नाही आणि चर्चा (टॉक) नाही. चर्चा होईल ती फक्त पाकिस्तानव्याप्त काश्मीरची (पीओके)," असेही त्यांनी यावेळी ठणकावले.
( नक्की वाचा : Pakistan News : तुकडे-तुकडे पाकिस्तान! स्वतंत्र बलुचिस्ताननंतर आता सिंधुदेशाची मागणीही तीव्र, वाचा सविस्तर )
पहलगाम हल्ल्याचा संदर्भ
बिकानेर दौऱ्यावर असलेल्या मोदींनी पलाना (देशनोक) येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, "22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी धर्म विचारून आमच्या बहिणींच्या भांगातील सिंदूर पुसून टाकला होता. तो गोळीबार पहलगाममध्ये झाला होता, पण त्या गोळ्यांनी 140 कोटी देशवासीयांचे हृदय छिन्नविछिन्न झाले होते. यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजुटीने संकल्प केला होता की, दहशतवाद्यांना धुळीस मिळवू. त्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देऊ. आज तुमच्या आशीर्वादाने, देशाच्या लष्कराच्या शौर्याने, आपण सर्व त्या प्रतिज्ञेवर खरे उतरलो आहोत.'
पंतप्रधानांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर त्यांच्या सरकारने तिन्ही सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते आणि तिन्ही सैन्यदलांनी मिळून असे चक्रव्यूह रचले की पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
( नक्की वाचा : Operation Sindoor : चिनी यंत्रणा जाम करत भारतानं फक्त 23 मिनिटांमध्ये कापले पाकिस्तानचे नाक! वाचा Inside Story )
'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर
पंतप्रधान यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, '22 तारखेच्या (एप्रिल) हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ सर्वात मोठे तळ उद्ध्वस्त केले. जगाने आणि देशाच्या शत्रूंनीही पाहिले की, जेव्हा सिंदूर बारूद बनतो तेव्हा काय परिणाम होतो.'
'मी देशवासीयांना सांगतो की, जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते, त्यांना धुळीस मिळवले आहे. जे हिंदुस्थानचे रक्त सांडत होते, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केला आहे. जे आपल्या शस्त्रांवर गर्व करत होते, आज ते ढिगाऱ्याखाली दबले आहेत. हा सूडाचा खेळ नाही, तर न्यायाचे नवे रूप आहे. हे ऑपरेशन सिंदूर आहे. हा केवळ संताप नाही, तर समर्थ भारताचे रौद्र रूप आहे. हे भारताचे नवे स्वरूप आहे,' असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर'ची तीन सूत्रे
मोदींनी स्पष्ट केले की, पाकिस्तान भारताकडून कधीही सरळ युद्ध जिंकू शकत नाही. "जेव्हा कधी सरळ युद्ध होते, तेव्हा पाकिस्तानला वारंवार पराभव पत्करावा लागतो. म्हणूनच पाकिस्तानने दहशतवादाला भारताच्या विरोधात लढण्याचे शस्त्र बनवले आहे."
मोदींनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन सूत्रे निश्चित केली आहेत:
1. पहिले सूत्र: भारतावर हल्ला झाला तर कडक प्रत्युत्तर मिळेल. वेळ आणि पद्धत आपले सैन्यदल ठरवतील आणि अटीही आपल्याच असतील.
2. दुसरे सूत्र: अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही.
3. तिसरे सूत्र: आपण दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादी सरकार यांना वेगळे पाहणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world