Solapur News : सोलापूरमध्ये उमेदवारी अर्जावरून भाजपचे दोन गट भिडले, मध्यस्थी करणाऱ्या मनसे नेत्याची थेट हत्या

Solapur Municipal Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गालबोट लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Solapur Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूरमध्ये एकाची हत्या झाली.
सोलापूर:

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी 

Solapur Municipal Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गालबोट लागलं आहे. शहरातील राजकीय संघर्षानं अत्यंत हिंसक वळण घेतले. सोलापूरमधील  प्रभाग 2 मध्ये बंडखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 2 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच वादाची ठिणगी पडली. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून शालन शिंदे रिंगणात आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपच्याच रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

हा अर्ज मागे घेण्यासाठी गेल्या काही तासांपासून मोठ्या घडामोडी सुरू होत्या. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे देखील याच पॅनलमधून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने हे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजप नेत्यांकडून मोठा प्रयत्न सुरू होता.

( नक्की वाचा : Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या )
 

रेखा सरवदे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्या कुटुंबावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत आहे. याच कारणावरून शिंदे आणि सरवदे या दोन गटात गुरुवारी जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडले. परिसरात तणाव वाढल्याने दोन्ही बाजूने समर्थक समोरासमोर आले होते.

Advertisement

मध्यस्थीसाठी गेले अन् जीव गमावला

या सर्व गोंधळात आणि वादात मध्यस्थी करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे तिथे पोहोचले होते. समाजात आणि प्रभागात वाद नको या उद्देशाने ते भांडण सोडवण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

( नक्की वाचा : Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं )
 

शिंदे गटाच्या लोकांनी त्यांच्यावर हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

बाळासाहेब सरवदे यांच्या मृत्यूनंतर सोलापूर मनसेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये पोलीस यंत्रणेलाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले.