जाहिरात

Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून समलिंगी नात्यातील संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 

Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं
Akola Crime News: या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून समलिंगी नात्यातील संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  गेल्या 3 वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या या जोडप्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशावरून वाद सुरू होते. याच वादाचा शेवट अखेर एकाच्या मृत्यूने झाला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

नात्यातील संशय आणि टोकाचा वाद

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात प्रतिम (नाव बदललेले) आणि नितेश जंजाळ हे दोघे गेल्या 3 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सुरुवातीच्या काळात त्यांचे संबंध अतिशय चांगले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते. 

प्रतिमचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय नितेशच्या मनात घर करून होता. या संशयावरून त्यांच्यात दररोज भांडणे होत असत. घटनेच्या रात्री देखील नितेशने बाहेरून जेवण आणले होते. जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच जुन्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

( नक्की वाचा : Akola News : जगायचं होतं सोबत, पण नशिबाने....अकोल्यातील शिक्षिका आणि ड्रायव्हरच्या प्रेमाचा असा झाला शेवट )

मध्यरात्री जीवघेणा हल्ला

रात्री उशिरा झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात नितेशने लाठीच्या सहाय्याने प्रतिमच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रतिमचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी कोणालाही या घटनेचा सुगावा लागला नाही. 

मात्र, सकाळी नितेश अचानक घरातून ओरडत बाहेर आला, तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली. तिथे प्रतिम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने नागरिकांनी तात्काळ सिव्हिल लाईन पोलिसांना पाचारण केले.

( नक्की वाचा : Shocking News : 10 वर्षांच्या नवसानं मिळालेला कोवळा जीव गेला; आईनं दुधात पाणी मिसळलं आणि तडफडून मृत्यू )

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रतिमच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांनी नितेशची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या नितेशने अखेर आपला गुन्हा मान्य केला. संशयातूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अकोल्यात 48 तासात दोन हत्या

नवीन वर्षाची सुरुवात अकोला शहरासाठी गुन्हेगारीच्या घटनांनी झाली आहे. विशेष म्हणजे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतच गेल्या 48 तासांत ही दुसरी हत्येची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी तंबाखूच्या क्षुल्लक वादातून एकाची हत्या झाली होती आणि आता समलिंगी नात्यातील वादातून दुसरा खून झाला आहे. 

( नक्की वाचा : नवीन वर्षाचे 'स्वीट्स' खाऊ घालण्याच्या बहाण्याने बोलावले अन् थेट गुप्तांगावरच चालवला चाकू, मुंबईत खळबळ )
 

अवघ्या दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com