Solapur Pregnant Woman Viral News : सोलापूर जिल्ह्यातून आरोग्य विभागाचा गंभीर प्रकार समोर आला आहे.अकलूज येथील शासकीय आयसीटीसी केंद्रातून एका गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.अहवालामुळे पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्यावर संशय घेत घराबाहेर काढले.विविध शासकीय,खासगी केंद्रांवर तपासणी केल्यावर सर्व अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे आयसीटीसीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत तीन सदस्य समिती स्थापन केली.येत्या आठ दिवसात सर्व प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची आश्वासन देण्यात आलं. ही घटना 16 ऑगस्ट 2024 रोजी घडली आहे.आयसीटीसी केंद्रात करण्यात आलेल्या तपासणीत महिलेचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आला. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.
महिलेच्या आरोग्यावरही परिणाम
सर्व अहवाल निगेटिव्ह आढळले. यामध्ये एसडीएस SDH सोलापूर,आयसीटीसी केंद्र (ICTC), तसेच हिंदलॅब्स येथे करण्यात आलेल्या एचआयव्ही-पीसीआर (HIV-PCR) आणि ( Viral Load) चाचण्यांमध्ये (RNA Not Detected) असा निष्कर्ष नोंदवण्यात आला. विनाकारण सुरू करण्यात आलेल्या औषधोपचारांमुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम झाला असल्याची तक्रार आहे.
नक्की वाचा >> Trending News: देशात 10 कोटी तर महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वगळणार? निवडणूक आगोयात खलबतं, शिवसेना अलर्ट मोडवर
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच पीडित महिलेला न्याय आणि नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, 1 मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी दिली आहे.
शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. एचआईव्ही मध्ये एकदा पॉसिटीव्ह झालेला रुग्ण पुन्हा निगेटिव्ह होत नसतो, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी सांगितले आहे.