जाहिरात

Solapur News: सोलापूर हादरलं! सुखी संसाराला कुणाची नजर लागली? पती-पत्नीच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण उघड

Solapur Couple Suicide Case: सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Solapur News: सोलापूर हादरलं! सुखी संसाराला कुणाची नजर लागली? पती-पत्नीच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण उघड
Solapur Couple Suicide Case: या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सोलापूर हादरले आहे.
सोलापूर:

Solapur Couple Suicide Case: सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका सुखी संसाराचा अंत केवळ एका व्यक्तीच्या एकतर्फी प्रेमाच्या जाचामुळे झाला आहे. सोलापुरात राहणाऱ्या एका तरुण पती-पत्नीने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्यांना सोडून जगाचा निरोप घेतला. या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सोलापूर हादरले असून या प्रकरणातील गुंता आता उलगडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

सोमनाथ धानोप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील हे दाम्पत्य सोलापूर शहरात किराणा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. दोन लहान मुलांच्या सहवासात त्यांचा संसार अत्यंत सुखाने सुरू होता. मात्र या आनंदी कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागली होती. 

शुक्रवारी या पाटील कुटुंबाच्या घरात असा काही प्रकार घडला ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. सोमनाथ आणि श्रीदेवी या दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. काही वेळातच त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. 

आई-वडिलांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून त्यांची दोन्ही लहान मुले प्रचंड घाबरली. त्यांनी तातडीने धावत जाऊन त्यांचे काका नवनाथ पाटील यांना ही माहिती दिली. नवनाथ यांनी तातडीने दोघांनाही दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्या दोघांची प्राणज्योत मालवली होती.

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

धक्कादायक उलगडा

या आत्महत्येमागे नेमके कारण काय असावे, याचा शोध घेत असताना पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी अभिषेक कोरे याच्या एकतर्फी प्रेमातून हा सगळा प्रकार घडला. आरोपी अभिषेक हा श्रीदेवी यांना सतत त्रास देत होता. केवळ त्रास देऊन तो थांबला नाही, तर त्याने त्यांना धमक्या देणे आणि समाजात बदनामी करण्याची भीती घालणे सुरू केले होते. 

या सततच्या मानसिक छळामुळे पाटील दाम्पत्य प्रचंड तणावाखाली होते. समाजात होणारी बदनामी आणि रोजचा त्रास सहन करण्यापेक्षा त्यांनी आपले जीवन संपवण्याचा कठोर निर्णय घेतला. या आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये अभिषेक कोरे याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

( नक्की वाचा : Akola News: 48 लाखांचा डिजिटल दणका! डॉलरच्या बदल्यात बड्या व्यापाऱ्याला गंडा, अकोल्यातील धक्कादायक प्रकार )

पोलिसांकडून आरोपीला बेड्या 

घटनेची माहिती मिळताच सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. घरात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक कोरे हा पसार झाला होता, मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला विजयपूर येथून ताब्यात घेतले आहे. 

अभिषेक कोरे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे त्रास दिला होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र या एका घटनेमुळे दोन लहान मुले आता कायमची पोरकी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com