कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो झाला रिक्षा चोर, अखेर रिक्षाचालकास अटक

कल्याण क्राईम ब्रान्चने अशाच एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सुरुवातील दुसऱ्या व्यक्तीची रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र पैसे अपूरे पडत असल्याने त्याने एक रिक्षा चोरण्याचा पर्याय निवडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कुटुंबाचं पोट भरण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवाचं रानं करीत असतो. अर्धवट शिक्षण असेल तर छोटेखानी व्यवसाय किंवा रिक्षा-टॅक्सी चालवण्याचा पर्याय निवडला जातो. मात्र अनेकदा रिक्षा चालकाला मुलांचं शिक्षण, कुटुंबाचा खर्च करता येईल इतक उत्पन्न मिळणं कठीण होतं. कल्याण क्राईम ब्रान्चने अशाच एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सुरुवातील दुसऱ्या व्यक्तीची रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र पैसे अपूरे पडत असल्याने त्याने एक रिक्षा चोरण्याचा पर्याय निवडला. मात्र चोरी केलेली रिक्षा फार दिवस चालली नाही, त्यातही बिघाड झाला. यानंतर आरोपीने पुन्हा दुसरी रिक्षा चोरली. या आरोपीचं नाव बबलू पवार आहे. काही दिवसांपूर्वी बबलूला कल्याण क्राईम ब्रान्चच्या पोलिसांनी अटक केली आहे. बबलू हा अंबरनाथ तालुक्यातील भाल गावातील राहणारा आहे. रिक्षा नंबर बदलून तो दररोज भाल ते कल्याण दरम्यान रिक्षा चालवित होता. त्यातून मिळणाऱ्या कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

कल्याण क्राईम ब्रान्च पोलिसांना याबाबत एक माहिती मिळाली होती, शीळ रस्त्यावर असलेल्या रुणवाल गार्डन समोर भाडे घेण्यासाठी एक रिक्षा चालक उभा असून त्याचा रिक्षा नंबर चुकीचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. या व्यक्तीने बबलू पवार चोरीची रिक्षा चालवत असल्याचं सांगितलं होतं. शेवटी क्राईम ब्रान्चचे पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरक आणि मिथून राठोड मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या जागेवर पोहोचले. त्या जागेवर रिक्षा नंबर एमएच 05 डीजी-2289 नंबरची रिक्षा उभी होती. रिक्षा चालकाला पोलिसांना नाव विचारलं, यावर त्याने बबलू पवार असं सांगितलं. त्याला रिक्षाचे कागदपत्र विचारण्यात आले. मात्र त्याच्याजवळ रिक्षाची कागदपत्रे नव्हती. म्हणून पोलिसांनी बबलू पवारला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली, शेवटी त्याने सर्व खरं खरं सांगितलं. ही रिक्षा कळव्यातून चोरी केल्याचं त्याने सांगितलं. रिक्षावर खोटा नंबर टाकला. याआधी एक रिक्षा चोरी केली होती, मात्र  ती रिक्षा बिघडल्याने दुसरी रिक्षा चोरल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. 

Advertisement

सुरुवातील बबलू दुसऱ्याच्या मालकीच्या रिक्षावर चालक म्हणून काम करीत होता. मात्र यात त्याला फारसे पैसे मिळत नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे कुटुंबाचं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता. त्यामुळे चोरीचा पर्याय निवडल्याचे बबलूने सांगितलं. बबलूने आधी उल्हासनगरातील एक रिक्षा चोरी केली. मात्र त्या रिक्षेत बिघाड झाला, म्हणून दुसरी रिक्षा चोरी केली. सध्या कल्याण क्राईम ब्रान्चकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 

Advertisement