पत्नीला कामावर जाण्यापासून रोखलं, बॉसने पतीला गाडीखाली चिरडलं

Latur Crime News: मोल बिरादार हा उदयगिरी येथे ड्राईव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालवतो. या ड्राईव्हिंग स्कूलमध्ये मयत प्रविणानंद लंके याची पत्नी काम करत होती.

Advertisement
Read Time: 2 mins

सुनील कांबळे, लातूर

पत्नीला कामावर जाण्यासाठी रोखलं म्हणून संतापलेल्या बॉसने पतीला कारखाली चिरडून संपवलं. लातूरच्या देवणी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी बॉसला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

अमोल बिरादार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला देवणी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमोल बिरादार हा उदयगिरी येथे ड्राईव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालवतो. या ड्राईव्हिंग स्कूलमध्ये मयत प्रविणानंद लंके याची पत्नी काम करत होती. मात्र काही कारणास्तव प्रविणानंदने पत्नीला तेथे काम करण्यास विरोध केला. यामुळे संतापलेल्या अमोल बिरादार याने त्याच्या हत्येचा कट रचला.

(नक्की वाचा -  Sindhudurg Accident : गणेशभक्तांच्या बसला अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक)

अमोल याने प्रविणानंद याला मंगळवारी मध्यरात्री आपल्यासोबत वागदरी येथील सप्तगिरी बारमध्ये नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली. मग त्याच्याशी भांडण काढले. त्यानंतर त्याला कारमधून रोडवर उतरवले आणि कारने जोरात त्याला धडक दिली. यात प्रविणानंदचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा - मुलुंडमध्ये हिट अँड रन, BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, एकाचा मृत्यू)

याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम 103 तथा 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बिरादार याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास येथील पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article