नवी मुंबईत एका भटक्या कुत्र्यामुळे 45 वर्षीय व्यक्तीच्या हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना मोठी मदत झाली आहे. ज्यावेळी हत्येची घटना घडली तेव्हा भटका कुत्रा घटनास्थळी हजर होता. त्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. हत्येच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसात आरोपीला अटक करण्यात आली.
या खळबळजनक हत्येच्या कहाणीची सुरुवात 13 एप्रिलच्या सकाळपासून सुरू झाली. नवी मुंबईतील नेरूळ भागात एके ठिकाणी रक्ताने माखलेल्या अज्ञान व्यक्तीचा मृतदेहाची सूचना पोलिसांना मिळाल्याने ते तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि तपास सुरू केला. पहिल्यांदा त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यावेळी समोर आलं की, हत्या झालेली व्यक्ती कचरा वेचण्याचं काम करीत होती. कोणा अज्ञात व्यक्तीकडून जड वस्तूने त्याच्या डोक्यावर आघात केला होता.
नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना पीटीआयला सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजनुसार पीडित बेशुद्ध झाल्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेला होता. हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आणि घटनेच्या वेळी आजूबाजूला कोणी नव्हतं. मात्र सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे यांना घटनास्थळी एक काळा कुत्रा दिसला, ज्याच्या पोटावर सफेट पट्टे होते.
पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली. तो कुत्रा सर्वसाधारणपणे भूर्या नावाच्या एका मुलासोबत राहत होता. यानंतर 15 एप्रिल रोजी भूर्या फ्लायओव्हरवर झोपल्याचं पोलिसांना पाहिलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूर्या याचं खरं नाव मनोज प्रजापती आहे. त्याने सांगितलं की, कचरा वेचणारी मृत व्यक्ती त्याला मारहाण करीत होती, खिशातून त्याचे पैसे चोरत असल्याने तो त्याच्यावर नाराज होता.
नक्की वाचा - मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
आरोपीने पोलिसांना सांगितलं की, 13 एप्रिलच्या सकाळी प्रजापती आणि कचरा वेचणाऱ्यांमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीत कचरा वेचणाऱ्याचा मृत्यू झाला. मनोज प्रजापतिने पोलिसांना सांगितलं की, आरोपी भटक्या कुत्र्याला नियमित खाऊ घालत होता. यामुळे कुत्रा नेहमी आरोपीच्या सोबत राहत होता. अद्यापही हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही, पोलीस याचा तपास करीत आहेत.