Shocking News : आंध्र प्रदेशातील एका कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारुन जीव दिला आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार श्री सत्य साई जिल्ह्यातल्या रामापुरम गावातील नारायण कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. चरण असं मृत तरुणाचं नाव आहे. तो या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला शिकत होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नारायण कॉलेजमध्ये सकाळी 10.15 मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार चरण अचानक वर्गातून उठतो. वर्गात अन्य विद्यार्थी बसले आहेत. तो कुणालाही न बोलता वर्गाच्या बाहेर बाल्कनीमध्ये जातो.
चरण बाल्कनीच्या कठड्यावर चढतो आणि कुणाला काही कळण्याच्या आतच खाली उडी मारुन जीव देतो. तो खाली पडल्याचा आवाज ऐकताच संपूर्ण कॉलेजमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माम होतं. वर्गातील मुलं पळत त्याच्यामागे धावतात. चरणनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
( नक्की वाचा : भयंकर! पत्नीचे तुकडे-तुकडे करुन प्रेशर कुकरमध्ये टाकले, माजी सैनिकानं गाठला क्रूरतेचा कळस )
या घटनेमुळे संपूर्ण आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ताण-तणाव या विषयावर या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |