सांगली:
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ त्यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेत जमिनीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यातच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाने यांच्यावर शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार केले होते. जखमी अवस्थेत खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मीरज पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदावर होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.