आधी सहकार्याची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली, चक्रावून सोडणाऱ्या 'त्या' हत्याकांडाचे गुढ उकललं

इस्टेट एजंट असलेल्या दोघांच्या हत्येचे गुढ उकलण्यात अखेर नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. जमीन व्यवहारातून या हत्या झाल्या असल्यातरी त्यामागचा कट पाहून पोलीसही हादरून गेले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

रिअल इस्टेट एजंट असलेल्या दोघांच्या हत्येचे गुढ उकलण्यात अखेर नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. जमीन व्यवहारातून या हत्या झाल्या असल्यातरी त्यामागचा कट पाहून पोलीसही हादरून गेले आहेत. नेरूळ इथल्या दोन रिअल इस्टेट एजंटची हत्या झाली होती. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला होता. याचा शोध लावण्यात अखेर पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुमित जैन आणि अमिर खानजादा हे दोघेही रिअल इस्टेट एजंट होते. जमीनीचे व्यवहार करणे हाच त्यांचा व्यवसाय होता. या दोघांचीही हत्या करण्यात आली होती. यातील सुमित जैन याने परस्पर पाली इथल्या साडेतीन एकर जमीनीचा सौदा केला होता. विशेष म्हणजे या जमीनीच्या मुळ मालकाचा मृत्यू झाला होता. एका बनावट व्यक्तीला जमीन मालक बनवण्यात आले. त्यानंतर ती जमीन साडेतीन कोटीला विकण्यात आली होती. या बनावट व्यवहाराची माहिती सुमित जैनचा सहकारी अमिर खानजादा याला मिळाली. त्यानंतर खानजादा याने या बनावट व्यवहारात आपलाही हिस्सा मागितला. 

ट्रेंडिंग बातमी - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरे हॉस्पिटलमध्ये दाखल

या बनावट जमीन व्यवहारात ज्याने ही जमीन घेतली होती त्याने 60 लाख आणि 90 लाखाचे दोन चेक सुमित जैन याला दिले होते. त्यातील 60 लाखाचे वाटप झाले होते. पण ज्यावेळी जमीन खरेदीदाराला या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याने 90 लाखाच्या चेकचे पेमेंट थांबले होते. पेमेंट का होत नाही त्यामुळे सुमित जैन हा अस्वस्थ झाला होता. याबाबत त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी त्यांना अमिर खानजादा यांने संबधित खरेदीदाराला फूस लावल्याचा संशय आला. त्यामुळे खानजादा याचा काटा काढण्याचे जैन याने ठरवले. त्यासाठी त्यांनी विठ्ठल नाखाडे याला पन्नास लाखाची सुपारी दिली.  

ट्रेंडिंग बातमी - पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड

त्यानुसार जागेच्या व्यवहारासाठी खानजादा याला 21 ऑगस्टला नेरूळ येथे नेण्यात आले. त्यानंतर सुमित जैन आणि विठ्ठल नाखाडे याने गाडीतच खानजादा याला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात फेकून देण्यात आला. त्यावेळी या सुमित जैन हा घाबरला होता. या हत्येत आपले नाव येवू नये यासाठी त्याने एक आयडिया केली. तो खोपोलीला आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:च्या पायावर गोळी मारली. त्यात त्याचा मोठ्या प्रमाणात सक्रस्त्राव होवू लागला. त्याच वेळी विठ्ठल नाखाडे याने आपले 50 लाख कधी देणार अशी विचारणा केली. त्यातून पुन्हा वाद झाला. शेवटी नाखाडे याने सुमित जैन याच्यावर चाकूने वार केले. त्यात सुमित जैन याचाही मृत्यू झाला. 

Advertisement
नक्की वाचा - तब्बल 10 लाख प्रत्यक्ष रोजगार, केंद्राचा नवा प्रकल्प; महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी बातमी

हे दोघेही घरातून 21 ऑगस्टला बाहेर पडले होते. पण घरी परतलेच नाहीत. त्यामुळे 22 तारखेला त्यांच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी शोध सुरू केला. तपासा दरम्यान पोलीसांना खोपोली इथे एक बेवारस कार दिसून आली. त्यात त्यांना रक्ताचे डाग, झाडलेल्या गोळ्यांची काडतूसे दिसून आली. त्यानंतर पोलीसांनी आपली तपासाची चक्र जलदगतीने फिरवली. त्यानंतर पोलीसांना सुमित जैन याचा ही मृतदेह खोपोली पेण मार्ग जवळील गोगोदे गावाजवळ सापडला. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

सुमित जैनचा मृतदेह पोलीसांना मिळाला होता. पण त्याच्या बरोबरच निघालेला अमिर खानजादा अजूही बेपत्ता होता. पोलीस त्याचाही शोध घेत होते. शेवटी पोलीस विठ्ठल नाकाडेपर्यंत पोहोचले. त्यानंतर नाकाडे याने झालेला सर्व घटनाक्रम पोलीसांना सांगितला. अमिर खानजादाचा खून कसा केला, सुमित जैनला का मारलं हे सर्व नाकाडेने कबुल केले. शिवाय खनजादाच्या हत्येची सुपारी सुमित जैनने आपल्याला दिली होती, असेही कबुलीत नाकाडे याने सांगितले आहे. त्यासाठी ठाण्यात बैठकही झाली होती असं तो म्हणाला. पोलीसांनी यानंतर या दुहेरी हत्याकांडात जयसिंग मुदलीयार, आनंद क्रूझ,वीरेंद्र कदम, अंकुश सिताफे यांना अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी दिली आहे. 

Advertisement