'15 कोटी द्या, राज्यपाल करतो...' शास्त्रज्ञांना लुटलं, नाशिकच्या तरुणाचा प्रताप

नाशिकमधील एका तरुणाने तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

किशोर बेलसारे, नाशिक: माझी नेत्यांसोबत ओळख आहे, राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगत नाशिकमधील एका तरुणाने तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजकीय नेत्यांसोबत ओळख  असल्याचे सांगत राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगत तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची नाशिक मध्ये फसवणूक करणाऱ्या 40 वयीन निरंजन सुरेश कुलकर्णी यास मध्यवर्ती शाखेने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 10 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा: MLA Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यात 8 आमदारांची अनुपस्थिती, कोण आहेत आमदार?

वर्षभरापूर्वी निरंजन कुलकर्णी याने चेन्नई येथील रहिवासी फिर्यादी नरसिम्हा रेड्डी, दामोदर रेड्डी यांना पंधरा कोटीमध्ये राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. संशयित निरंजन कुलकर्णी याने नाशिकमध्ये 100 एकर जमीन व चांदशी गावात प्लॉट असल्याचे खोटे दस्तावेज कागदपत्र बनवून नरसिम्हा रेड्डी यांना राज्यपालपदाचे आमिष दाखवले.

तसेच त्यांच्याकडून  5 कोटी रुपयेसुद्धा हडपले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नरसिम्हा रेड्डी आणि दामोदर रेड्डी यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी नरसिम्हा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके अधिक तपास करीत आहेत. 

Advertisement

महत्वाची बातमी: दारुबंदीसाठी एल्गार! महिलांनी गावात मतदान घेतलं, निर्णय झाला; निकाल काय?