जाहिरात

Nida Khan: मतीन पटेलचं घर रडारवर! निदा खानला घरामध्ये दडवलं, आता महापालिका घरच तोडणार, संभाजीनगरमध्ये धमाका

AIMIM Corporator Matin Patel : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन पटेल यांना मोठा दणका दिला आहे. त्यांच्या घरावर आता थेट बुलडोझर चालणार असल्याची माहिती आहे.

Nida Khan: मतीन पटेलचं घर रडारवर! निदा खानला घरामध्ये दडवलं, आता महापालिका घरच तोडणार, संभाजीनगरमध्ये धमाका
AIMIM Corporator Matin Patel : निदा खानचा संरक्षक मतीन पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर:

AIMIM Corporator Matin Patel : नाशिकमधील बहुचर्चित 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणाला आता एक नवे आणि मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनाही या प्रकरणात आरोपी केले आहे. केवळ पोलीस कारवाईवरच हे प्रकरण थांबलेले नाही, तर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन पटेल यांना मोठा दणका दिला आहे. त्यांच्या घरावर आता थेट बुलडोझर चालणार असल्याची माहिती समोर आली असून, प्रशासनाने कारवाईची तयारी पूर्ण केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा मोठा दणका

नगरसेवक मतीन पटेल यांना केवळ कायदेशीर कारवाईचाच सामना करावा लागणार नाही, तर त्यांच्या अनधिकृत बांधकामावरही आता संक्रांत आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून या कारवाईची नोटीस आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 'कॉर्पोरेट जिहाद' सारख्या गंभीर प्रकरणात नाव आल्यानंतर महापालिकेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Latest and Breaking News on NDTV

मतीन पटेलच्या कबुलीनंतर निदा खानचा पर्दाफाश

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला मतीन पटेल याचे एका जुन्या घटनेबद्दल रीतसर स्टेटमेंट घेतले. सुरुवातीला मतीनने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

 मात्र, पोलिसांच्या तपासाचा रोख आणि पोलिसी खाक्या पाहिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास डगमगला. अखेर मतीनने कबुली दिली की, निदा खान ही तिचे आई-वडील, मावशी आणि भाऊ कौसर पार्क परिसरात लपून बसले आहेत. या एका कबुलीमुळे पोलिसांचा 42 दिवसांचा प्रदीर्घ शोध संपला आणि निदा खान पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

( नक्की वाचा : Shirdi News: 100 कोटींचा किराणा अन् 'असा' दर्जा? साई संस्थानच्या प्रसादालयातील 'त्या' पाहणीने खळबळ )
 

नगरसेवक मतीन पटेल पोलिसांच्या रडारवर

निदा खान ही मतीन पटेल यांच्या घरात आश्रित म्हणून राहत होती, ही बाब तपासात निष्पन्न झाली आहे. गुन्हेगाराला आश्रय देणे आणि माहिती लपवणे या कारणावरून पोलिसांनी मतीन पटेल यांना या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. 

एका लोकप्रतिनिधीनेच अशा गंभीर प्रकरणातील आरोपीला आपल्या घरात जागा दिल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. याच गुन्ह्याचा ठपका ठेवत आता त्यांच्या मालमत्तेवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

तपास यंत्रणांची चिकाटी 

गेल्या 42 दिवसांपासून पोलीस निदा खानच्या शोधात होते. या काळात अनेक तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मतीन पटेलपर्यंत धागेदोरे शोधून काढले. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर सहभागाची चौकशी सुरू आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बुलडोझर कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

या प्रकरणात मतीन पटेल यांच्यावर होणारी ही कारवाई इतर आरोपींसाठी आणि त्यांना मदत करणाऱ्यांसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com