Teacher's death : मध्य प्रदेशातील दतिला जिल्ह्यातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथील बस स्टँडजवळ एका सरकारी दिव्यांग शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला. हैराण करणारी बाब म्हणजे हे शिक्षक बस स्टँडजवळ अंडी खात होते. त्याचवेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती आजूबाजूला पसरताच खळबळ उडाली. शिक्षकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उकडलेली अंडी खात होते तोच...
मृत शिक्षकाची ओळख अशोक कुमार असल्याचं समोर आलं आहे. ते दलिता जिल्ह्यातील राहणारे आहेत. राजापूर गावात शिक्षक पदावर तैनात होते. अशोक कुमार दिव्यांग होते. मात्र तरीही कारणं न देता निष्ठेने आपली कर्तव्य पार पाडत होते. बुधवारी शाळेत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतल्यानंतर सायंकाळी साधारण पाच वाजता दतियाला परतले. तेव्हा काहीतरी खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आपली गाडी थांबवून उकडलेली अंडी खरेदी केली आणि तेथेच खाऊ लागले. झी हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अचानक तब्येत बिघडली...
अंडी खात असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि अचानक ते जमिनीवर कोसळले. कुणाला काही कळेल त्याआधी त्यांना हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला होता. काही वेळाने गर्दी जमा झाली. कोणीतरी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. शेवटी त्यांना मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आणि कुटुंबाला शिक्षकांच्या मृत्यूची सूचना देण्यात आली. यानंतर कुटुंबात शोककळा पसरली.