इंग्रजी माध्यमाचा शिक्षक, 5 महिने वर्गात सुरू होता भयंकर प्रकार; विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर बिंग फुटलं!

हाच शिक्षक एक विद्यार्थिनीसाठी नराधम ठरला आहे. त्याच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक तुम्हाला अनुभवसंपन्न करतात, ज्ञान देतात. मात्र हाच शिक्षक एक विद्यार्थिनीसाठी नराधम ठरला आहे. त्याच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या शाळेत आणि शिकवणीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने अनेक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित दुबे (वय 30) असं या नराधम शिक्षकाचं नाव असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून आरोपी अमित दुबे यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

नराधम आरोपी अमित दुबे (30) हा नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहे.  तो वलईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी क्लासेस देखील घेतो. त्याच्या शाळेत शिकणार्‍या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर त्याने क्लास मध्ये शिकविण्याचा बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केला, तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली. यानंतर त्याने वारंवार तिला धमकावून तिच्यावर शाळेत आणि शिकवणी वर्गात बलात्कार करत होता.

Advertisement

नक्की वाचा - नितेश राणे म्हणाले, 'हिरवा साप', मनसेचाही हिसका; स्टँडअपदरम्यान मुनव्वर नेमकं काय म्हणाला?

मागील मार्च महिन्यापासून ते जुलै पर्यंत असे 5 महिने या नराधमाने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींनी केला आहे. अखेर या पीडितेला वारंवार होणाऱ्या अत्याचार सहन न झाल्याने तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Advertisement
Topics mentioned in this article