Mohammed Shami : मोहम्मद शमीला आला खतरनाक मेल, भावानं घेतली पोलिसांमध्ये धाव! प्रकरण काय?

Mohammed Shami News : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शमीला ईमेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे.या प्रकरणात शमीचा भाऊ हसीबनं अमरोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. मोहम्मद शमी सध्या आयपीएल 2025 मध्ये व्यस्त आहे. तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

मोहम्मद शमीचा भाऊ हसीब यानं या धमकीबाबत माहिती दिली आहे. हसीबनं अमरोहा पोलिसांना सांगितलं की, शमीला रविवारी हा धमकीचा ईमेल आला होता. राजपूत सिंधर या नावाच्या आयडीवरुन हा ईमेल पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'आम्ही तुला ठार मारुन टाकू. सरकार आमचं काहीही करु शकणार नाही,' अशी धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली आहे. 

( नक्की वाचा : IPL Cricketer : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला गंभीर आरोपाखाली अटक, मैत्रिणीनेच केली होती तक्रार )

शमीला हा धमकीचा ईमेल का पाठवण्यात आला आहे याचं कारण अद्याप समजलेलं नाही. पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणानंतर शमीच्या फॅन्समध्ये काळजीचं वातावरण आहे.

( नक्की वाचा : तरुणाशी Instagram वर मैत्री, घरी भेटायला बोलवलं आणि लिंग बदललं! धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही हादरले )

शमीला पाठवण्यात आलेल्या ईमेलचे लोकेशन शोधण्याचं काम सध्या सुरु आहे. त्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचंही त्यांनी सांगितलं.  
 

Advertisement
Topics mentioned in this article