
Rajasthan Kidnapping Case : सोशल मीडिया हा हल्ली सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियाचा वापर हा नवी मैत्री करण्यापासून ते परस्परांशी पैशांचे व्यवहार करण्यापर्यंत केला जातो. त्यामधून गुन्हेगारी घटना देखील वारंवार उघड झाल्या आहेत. पण, 22 वर्षांच्या तरुणाच्या बाबतीत घडलेला प्रकार समजल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
राजस्थान जिल्ह्यातल्या सीकरमधलं हे प्रकरण आहे. येथील एका 22 वर्षांच्या तरुणासोबत अमानवीय आणि धक्कादायक अत्याचार करण्यात आले आहेत. या तरुणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सुनीलची (आरोपीचे नाव) ओळख झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर सुनीलनं त्याला घरी भेटायला बोलावलं. पीडित तरुण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी गेला आणि त्याचा घात झाला. 'नवभारत टाईम्स' नं हे वृत्त दिलंय.
( नक्की वाचा : 13 वर्षांच्या मुलासोबत पळालेली शिक्षिका अखेर सापडली, पोलिसांना म्हणाली मी गर्भवती, माझ्या पोटात... )
याबाबत पीडित तपुणानं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुनीलनं त्याला तीन महिने बंधक बनवले होते. या काळात त्याच्याशी अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवले. तसंच जबरदस्तीनं लिंग बदल ऑपरेशन देखील केलं. पीडित तरुणानं फतेहपूर सदर स्टेशनमध्ये सुनीलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणानं पोलिसांना सांगितलं की, जवळपास तीन वर्षांपूर्वी त्याची आणि सुनीलची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ते बराच काळ एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात नियमित चॅटिंग होत असे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये सुनीलनं त्याला भेटायला बोलावलं. त्यावर विश्वास ठेवून तो सुनीलच्या शेतामधील घरात गेला. तिथं सुनीलनं त्याला बंधक बनवलं आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले.
सुनीलनं या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून त्याला धमकावलं. या तक्रारीनुसार आरोपीनं पीडित तरुणाला सीकरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं. तेथील डॉक्टरांशी त्याचे संगनमत होते. त्यांनी तिथं त्याचं जबरदस्तीनं त्याचे लिंग बदल ऑपरेशन केले. त्याबाबतच्या कागदपत्रावर जबरदस्तीनं स्वाक्षरी घेतली.
या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणाची मेडिकल चाचणी करण्यात येणार आहे. तसंच आरोपीचा शोध सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world